टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने मालिकेच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर तिच्या आईच्या तक्रारीवरून तिचा बॉयफ्रेंड आणि सहकलाकार शिझान खानला पोलिसांनी अटक केली होती. त्याला रविवारी कोर्टात हजर केलं असता २८ डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती. आज पुन्हा त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने शिझानच्या कोठडीत वाढ केली आहे. शिझान आता ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत असेल.

“तुनिषाचं निधन, शिझान कोठडीत अन् मालिकेचं शूटींग…”; FWICE अध्यक्ष म्हणाले “सेटवरील मजुरांचे फोन…”

शिझान खान मागच्या चार दिवसांपासून पोलीस कोठडीत होता. पोलिसांनी त्याची चौकशी केली, पण तो वारंवार त्याचा जबाब बदलत आहे. तसेच आतापर्यंत त्याने कोणतीही माहिती दिलेली नाही, त्यामुळे पोलिसांनी त्याची कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. कोर्टाने पोलिसांची मागणी मान्य करत शिझानची कोठडी २ दिवसांनी वाढवली आहे.

“हा खून आहे” तुनिषा शर्मा प्रकरणावर कंगना रणौतची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाली, “…हे तिचं शोषण करण्यासाठी पुरेसं होतं”

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, वालीव पोलिसांनी शिझानला आज न्यायालयात हजर केलं. पोलिसांनी त्याच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती. आतापर्यंत तो चौकशीत नीट काही बोलत नसल्याचा युक्तिवाद पोलिसांनी केला. तो एकतर गप्प राहतो किंवा वेगवेगळी विधानं करतो. त्याच्या मोबाईल फोनवरूनही कोणतेही संशयास्पद चॅट समोर आलेले नाही. त्याची एक सिक्रेट गर्लफ्रेंड असल्याचं कळलंय, त्यामुळे तिची माहिती मिळवण्यासाठी त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती. त्यानंतर कोर्टाने ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत वाढ केली आहे.

Video: तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर तिला शिझाननेच नेलेलं रुग्णालयात; CCTV फुटेज आलं समोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२४ डिसेंबर रोजी अलिबाबा मालिकेच्या सेटवर तुनिषाने शिझानच्या मेकअप रूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. यानंतर तुनिशाच्या आईने शिझानवर तिच्या मृत्यूला प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाची तातडीने दखल घेत पोलिसांनी रात्री उशिरा त्याला अटक केली होती.