अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केल्यानंतर मनोरंजन क्षेत्रात खळबळ माजली आहे. तुनिषा शर्माने शनिवारी दुपारी वसईतील स्टुडिओत गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी तिचा प्रियकर आणि मालिकेतील सहकलाकार शिझान खानला याला अटक केली आहे. त्याच्यावर तुनिषाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. शिझानने प्रेमसंबंध तोडल्याने तुनिषाने आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या आईने केली आहे. अशातच तुनिषाच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केले आहेत.

तुनिषा शर्मानेच्या एका जवळच्या नातेवाईकाने शिझानच्या बाबतीत मोठे विधान केले आहे. ANI शी बोलताना सांगितले की, “शिझान तुनिषाबरोबर रिलेशनशिपमध्ये असतानादेखील तो इतर मुलींचा संपर्कात होता. त्यामुळेच तुनिषा तणावात होती. १६ डिसेंबरला तुनिषाच्या लक्षात आले की शिझान आपल्याला फसवत आहे, हे समजताच तिला पॅनिक अटॅक आला. याबाबत तुनिषाच्या आईनेदेखील शिझानला विचारले होते की माझ्या मुलीच्या जवळ आलास आणि अचानक निघून गेलास हे बरोबर नाही,” पवन शर्मा यांनी ANIशी बोलताना ही माहिती दिली.

तुनिषा शर्मावर २७ डिसेंबर रोजी होणार अंत्यसंस्कार; जवळच्या नातेवाईकांनी दिली माहिती

दरम्यान शिझानवर भारतीय दंड विधान कलम ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शिझानला ४ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पोलिसही या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. शिवाय गेल्या २४ तासात तुनिषा कोणाच्या संपर्कात होती, तिने कोणाशी फोनवर संपर्क साधला त्या सगळ्यांची चौकशी होत असून जबाब नोंदवले जात आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या सब टीव्ही मालिका ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’मध्ये तुनिशा राजकुमारी मरियमची भूमिका साकारत होती. तुनिशा ‘फितूर’, ‘बार बार देखो’, ‘कहानी २: दुर्गा रानी सिंह’, ‘दबंग ३’ यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसली होती. तुनिषाने ‘फितूर’ आणि ‘बार बार देखो’ मध्ये तरुण कतरिना कैफची भूमिका साकारली होती.