टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने २४ डिसेंबरला मालिकेच्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या केली. तुनिषाच्या आत्महत्येप्रकरणी तिचा बॉयफ्रेंड शीझान खानला पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं आहे. त्याची चौकशी सुरू असून रोज या प्रकरणात नवीन खुलासे होत आहेत.

तुनिषा शर्मा व शीझान खान अलिबाबा: दास्तान ए कबूल मालिकेत मुख्य भूमिका साकारत होते. तुनिषाऐवजी आता मालिकेत दुसऱ्या अभिनेत्रीला कास्ट करण्यात आलं आहे. तर शीझानलाही या मालिकेतून काढून टाकण्यात आलं आहे. तुनिषाच्या आत्महत्येनंतर पाच दिवसांनी या मालिकेच्या शूटिंगला पुन्हा सुरुवात करण्यात आली. २९ डिसेंबरला मालिकेचं शूटिंग सुरू करण्यात आलं. आता मालिकेचे नवीन भाग प्रसारित केले जाणार आहेत.

तुनिषाची सहकलाकार असलेल्या सपना ठाकूरने याबाबत माहिती दिली. ती म्हणाली, “अजूनही आम्ही त्या धक्कातून सावरलो नाही आहोत. त्यामुळे सेटवर शूटिंगसाठी जाणं फार कठीण होत आहे. शो सुरू राहिला पाहिजे हे बोलणं खूप सोपं आहे. पण जेव्हा तुम्ही परिस्थितीला सामोरे जाता, तेव्हा त्याची जाणीव होते”.

हेही वाचा>>“मी आत्महत्या करेन किंवा…”, चित्रा वाघ यांच्या वक्तव्यानंतर उर्फी जावेदने केलेली पोस्ट चर्चेत

हेही वाचा>>“एक सुंदर मुलगी मला भेटायला आली आणि…”, प्रसाद ओकने शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

अलिबाबा मालिकेच्या शूटिंग सेट बदलण्यात आला आहे. तुनिषाने आत्महत्या केलेल्या सेटवर भीतीचं वातावरण होतं. “मला शूटिंगसाठी फोन आल्यानंतर त्याच सेटवर आपण शूटिंग करणार आहोत का, असा प्रश्न मी त्यांना विचारला. पण दुसऱ्या सेटवर शूटिंग होणार आहे, हे कळल्यानंतर मला थोडं बरं वाटलं. त्या सेटवर तुनिषाबरोबरच्या अनेक आठवणी आहेत”, असंही सपना म्हणाली.

हेही वाचा>>‘हर हर महादेव’ नंतर सुबोध भावे नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टर शेअर करत म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुनिषाने आत्महत्या केल्यानंतर तिच्या पार्थिवावर २७ डिसेंबरला अंत्यसंस्कार करण्यात आले. तुनिषाच्या आईने शीझानवर तिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा आरोप केला आहे. तर शीझानच्या कुटुंबियांनी तुनिषाच्या आईवर तिचा छळ करण्याचे गंभीर आरोप केले आहेत.