टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्येबाबत रोज नवनवीन खुलासे होत आहेत. बॉयफ्रेंड व सहकलाकार असलेल्या शीझान खानला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. तुनिषा आत्महत्या प्रकरणी शीझानची कसून चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.

शीझानने पोलीस चौकशी दरम्यान तुनिषाबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचं मान्य केलं होतं. त्याने ब्रेकअप केल्यामुळे तुनिषाने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्यावर होत होता. याबाबत पोलिसांनी शीझानची चौकशी केली आहे. परंतु, शीझान ब्रेकअपबाबत वेगवेगळ्या कथा सांगून दिशाभूल करत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. दोन दिवसांच्या चौकशीनंतर आता महिला पोलीस अधिकारी शीझानची याप्रकरणी चौकशी करत आहे.

हेही वाचा>> “महेश मांजरेकरांनी माझं नाव बदललं”, राखी सावंतचा खुलासा; जाणून घ्या तिचं खरं नाव

‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार, सुरुवातीला शीझान काहीच बोलण्यास तयार नसल्याने त्याच्या बॉडी लॅंगवेजवरुन काहीही अंदाज लावणं फार कठीण जात होतं. परंतु, काल चौकशीदरम्यान महिला पोलीस अधिकाऱ्याने “तुनिषाच्या अंत्यसंस्काराला जायचं आहे का?”, असं शीझानला विचारल्यावर त्याला रडू कोसळलं.

हेही पाहा>> Photos: मेकअप रुम ते मालिकेचा सेट; शीझान खानने शेअर केलेले तुनिषा शर्माबरोबरचे ‘ते’ फोटो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुनिषाने २४ डिसेंबरला मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली. आज तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार आहेत. ‘अलिबाबा: दास्तान ए कबूल’ मालिकेत ती मुख्य भूमिका साकारत होती.