‘ठिपक्यांची रांगोळी’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांना खूप आपलंसं केलं आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असतो. आता या मालिकेतून अभिनेते शरद पोंक्षे यांची एक्झिट होणार आहे. तर त्या जागी अभिनेते उदय टिकेकर त्याच भूमिकेत दिसतील. या भूमिकेबद्दल उदय टिकेकर यांनी एक मोठा खुलासा केला आहे.

‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत शरद पोंक्षे दादा काका ही व्यक्तिरेखा साकारत होते. पण नुकताच त्यांनी यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. स्टार प्रवाहच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी याबद्दलची माहिती दिली. तर आता त्यांची जागा उदय टिकेकर घेणार आहेत. शरद पोंक्षे यांच्या आधी दोन वर्षांपूर्वी ही भूमिका उदय टिकेकरांनाच आधी विचारण्यात आली होती असं म्हणत त्यांनी तेव्हा ती मालिका का नाकारली याचं कारण आता सांगितलं आहे.

आणखी वाचा : शरद पोंक्षे यांच्या लेकीची गगनभरारी; अभिमान व्यक्त करत अभिनेते म्हणाले, “आज माझी मुलगी…”

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले, “दोन वर्षांपूर्वी शरद पोंक्षे याने ही भूमिका स्वीकारण्याच्या आधी या भूमिकेची विचारणा मला झाली होती. तेव्हाच मला या मालिकेची कथा आणि ही भूमिका खूप आवडली होती. पण तेव्हा मी इतर प्रोजेक्टमध्ये खूप व्यग्र असल्याने मला या भूमिकेला तेव्हा नकार द्यावा लागला. माझ्यानंतर ही भूमिका माझ्याच इतका टॅलेंटेड अभिनेता शरद पोंक्षे साकारू लागला. पण आपल्या नशिबात असतं ते आपल्याकडेच येतं तसं ते झालं. जेव्हा आपण खूप काम करत असतो तेव्हा आपल्याला काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात. आता बाप्पाच्या कृपेने पुन्हा एकदा ते माझ्याकडे आला आहे आणि मी ही भूमिका करण्यासाठी खूप उत्सुक आहे.”

हेही वाचा : “माझी २ महिन्याची लेक ५ तास उपाशी होती अन् मी…”, प्रसिद्ध मराठमोळ्या गायिकेने शेअर केला डिप्रेशनचा अनुभव

तर आता उदय टिकेकर या नवीन भूमिकेत दिसणार असल्याने त्यांचे चहा ते खूप खुश झाले आहेत.