उर्फी जावेद हे नाव आता खूप प्रसिद्ध झालंय. इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियीवर रोज दुसऱ्या दिवशी तिच्या नवनवीन आउटफिट्सचे व्हिडीओ व्हायरल होत असतात.

कॉन्ट्रोव्हर्शियल क्वीन म्हणून ओळखली जाणारी उर्फी आता वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. बिग बॉस ओटीटी फेम उर्फीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामुळे इंटरनेट युजर्सना चांगलाच धक्का बसलाय. उर्फीने तिचा सेल्फी इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. पण, हा फोटो थोडा वेगळा आहे. या फोटोत उर्फीने चक्क टक्कल केल्याचं दिसतंय.

हेही वाचा… ‘बिग बॉस ओटीटी- ३’ मध्ये सलमान खानऐवजी दिसणार संजय दत्त अन्….?, शोच्या निर्मात्यांनी ‘या’ बॉलीवूड कलाकारांशी साधला संपर्क

गुलाबी रंगाचं टॉप, गळ्यात चैन, सॉफ्ट मेकअप असा उर्फीचा लूक या फोटोत दिसतोय. उर्फीचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, “बस हेच बघायचं बाकी राहिलं होतं.” तर दुसऱ्याने तिला “गंजी चुडैल” असं म्हटलं आहे. एका युजरने कमेंट करत “हा स्कॅम आहे” असं लिहिलं. तर अनेक जण म्हणाले की “हा एक फिल्टर आहे.”

हेही वाचा… प्रसिद्ध गायिका सावनी रविंद्र मत न देताच परतली; कारण सांगत म्हणाली, “वोटिंग ऑफिसरची…”

दरम्यान, उर्फीच्या या फोटोची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. उर्फीच्या कामाबाबत सांगायचं झालं तर उर्फी स्प्लिट्सविला शोची होस्ट आहे. दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी यांनी खुलासा केला की, ‘लव्ह सेक्स और धोका २’मध्ये उर्फी जावेद झळकणार आहे. सीनबद्दल बोलताना बॅनर्जी म्हणाले की, उर्फीचा एक अनकट सीन आहे आणि मला तो सीन खूप आवडतो.

हेही वाचा… “मी इतकी ढसाढसा रडले…”, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ शूटिंगच्या पहिल्याच दिवशी मृणाल दुसानीसला झालेले अश्रू अनावर, अभिनेत्री म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याआधी झूम टीव्हीशी बोलताना, चित्रपट निर्माते म्हणाले होते, “मला उर्फीचा फॅशन सेन्स आवडतो. ती तुम्हाला नेहमीच एक आव्हान देते. तिचा जो दृष्टिकोन आहे तो मला फार आवडला. मी तिची एकदा भेट घेतली. या चित्रपटात तिची भूमिका अगदी लहान आहे पण मला खात्री आहे की तिला एक दिवस प्रमुख भूमिका मिळतील. पण मला उर्फीचे व्यक्तिमत्त्व आवडते.”