scorecardresearch

“माझ्या कपड्यांमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या” उर्फी जावेदने मागितली चाहत्यांची माफी, म्हणाली “यापुढे…”

उर्फी जावेदने मागितली चाहत्यांची माफी, ट्वीट करत म्हणाली…

urfi javed tweet goes viral
सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद. (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद कायमच चर्चेत असते. उर्फी तिच्या अतरंगी कपड्यांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. चित्रविचित्र कपड्यांमधील उर्फीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी वायर, कधी टॉयलेट पेपर तर कधी कपड्यांच्या चिमट्यांपासून ड्रेस बनवणाऱ्या उर्फीच्या कपड्यांवरुन अनेकांनी आक्षेप घेतला होता. आता उर्फीने चक्क चाहत्यांची माफी मागितली आहे.

उर्फीने ट्वीट करत कपड्यांमुळे भावना दुखावल्याचं म्हणत माफी मागितली आहे. “माझ्या कपड्यांमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यासाठी मी माफी मागत आहे. यापुढे तुम्हाला बदलेली उर्फी पाहायला मिळेल. कपडेही बदलेले असतील. माफी,” असं उर्फीने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> “नाटकाच्या प्रयोगादरम्यान एक मोठा उंदीर स्टेजवर आला अन्…” किरण मानेंनी सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाले…

उर्फीच्या या ट्वीटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. उर्फीने कपड्यांमुळे माफी मागितल्याने चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. अनेकांनी उर्फीच्या या ट्वीटवर कमेंटही केल्या आहेत. अनेकांनी “उर्फी तुला बदलण्याची गरज नाही” असं म्हटलं आहे. तर काहींनी उर्फीने एप्रिल फूलसाठी हे ट्वीट केल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा>> “मी बाबांसारखी असल्याचा मला अभिमान” वडिलांबद्दल बोलताना भाऊ कदमची लेक भावुक, अभिनेता व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

काहीच दिवसांपूर्वी उर्फीचं बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने कौतुक केलं होतं. “उर्फी प्रचंड धाडसी आणि हुशार आहे. तिला जे हवं तेच ती करते. तिचा आत्मविश्वास मला आवडतो,” असं करीना म्हणाली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 19:54 IST

संबंधित बातम्या