बिग बॉस १६ चा विजेता एमसी स्टॅन सध्या बराच चर्चेत आहे. सोशल मीडियावर त्याचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. बिग बॉस जिंकल्यानंतर एमसी स्टॅनने एक इन्स्टाग्राम लाइव्ह केलं होतं ज्यात ५ लाखांपेक्षा जास्त लोक सहभागी झाले होते. या लाइव्हने शाहरुख खानचाही विक्रम मोडला होता. सध्या सोशल मीडियावर एमसी स्टॅनचं खूप कौतुक केलं जात आहे. एमसी स्टॅनच्या चाहत्यांमध्ये आता आणखी एका नावाची भर पडली आहे ती म्हणजे उर्फी जावेद.

उर्फी जावेदचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या बराच चर्चेत आहे. ज्यात तिने सर्वांसमोरच एमसी स्टॅन तिला खूप आवडत असल्याचं म्हटलं आहे. एवढंच नाही तर पापाराझींना विनंतीही केली आहे की तिचा मेसेज त्यांनी एमसी स्टॅनपर्यंत पोहोचवावा. पण या व्हिडीओमुळे आता उर्फी जावेदला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

आणखी वाचा- Video: Bigg Boss 16 मधील प्रवास कसा होता? विजेत्या MC Stan ने फक्त दोन मराठी शब्दांत दिलं उत्तर, म्हणाला…

उर्फी जावेदची सोशल मीडियावर बरीच लोकप्रियता आहे आणि ती सुद्धा चर्चेत राहण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. नेहमीच आपल्या अतरंगी फॅशन आणि कपड्यांमुळे चर्चेत राहणारी उर्फी जावेद काही वेळा तिच्या बिनधास्त वक्तव्यांमुळेही चर्चेचा विषय ठरताना दिसते. नुकतीच जेव्हा ती मुंबईमध्ये नव्या आउटफिट्ससह स्पॉट झाली तेव्हा तिला एमसी स्टॅनबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उर्फी म्हणाली, “स्टॅन मला खूप आवडतो. मी त्याच्यावर प्रेम करते. मला जेव्हाही विचारलं गेलं की कोण जिंकणार तेव्हा मी स्टॅनचंच नाव घेतलं होतं. त्याचं शेमडी बोलणं मला आवडतं. तुम्ही त्याच्यापर्यंत माझा हा मेसेज पोहोचवा की मी त्याच्यावर प्रेम करते. आता तो मोठा व्यक्ती झाला आहे.”

आणखी वाचा- आरके स्टुडिओनंतर विकला गेला राज कपूर यांचा चेंबूर येथील बंगला, कोण आहे नवा मालक?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उर्फीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे आणि त्यानंतर तिला यावरून ट्रोलही केलं जात आहे. उर्फीला ट्रोल करताना एका युजरने कमेंटमध्ये लिहिलं, “छपरीला छपरी माणूसच आवडणार ना.” तर दुसऱ्या युजरने लिहिलं, “ही खरी शेमडी दिसली आहे.” तर आणखी एकाने लिहिलं, “हो तुला त्याचा शेमडी शब्द आवडणारच कारण तो तुला पाहिल्यानंतर शेमडीच म्हणेल. त्यामुळेच तू असं बोलत आहेस जेणेकरून नंतर तुला जास्त अपमानकारक वाटणार नाही.” याशिवाय “तोही तुझ्यासारखाच आहे त्यामुळेच तुला आवडतो” अशी कमेंटही एका युजरने केली आहे.