मराठी अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मनोरंजनसृष्टीतून ब्रेक घेतल्यानंतर उर्मिला सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्ध झाली. यूट्यूबवर उर्मिला तिचे लाईफस्टाइल, फॅशन, मेकअपचे व्हिडीओ शेअर करत असते.

उर्मिला सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते आणि आपल्या चाहत्यांबरोबर अपडेट शेअर करत असते. नुकतीच उर्मिलाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे, ज्यात उर्मिलाने एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. उर्मिलाचं कोणतंही टेलिग्राम अकाउंट नसून तिच्या नावाने एक फेक आयडी बनवण्यात आले होते. यात उर्मिलाच्या फेक अकाउंटवरून एका व्यक्तीला मेसेज केला आहे. यात असं लिहिलं होतं, “माझ्या चाहत्याचे खूप अभिनंदन. माझ्या गिवअवेमध्ये तुमची निवड झाली आहे. तुमच्या बक्षीसासाठी (UrmilaNimbalkar01) या टेलिग्रामवर मला मेसेज करा.”

उर्मिलाने याचा स्क्रीनशॉट टाकून स्टोरीवर शेअर केला. प्रेक्षकांना सत्य परिस्थिती सांगत तिने लिहिले, माझं कोणतंच टेलिग्राम चॅनेल नाही. त्याचप्रमाणे मी कोणतंही गिवअवे करत नाही आहे, अशा ऑफर्सला बळी पडू नका.”

हेही वाचा… ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटासाठी अंकिता लोखंडेने किती मानधन घेतलं? निर्माता खुलासा करत म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘एक तारा’, ‘डम डम डिगा डिगा’, ‘सिंधुताई सकपाळ’ अशा अनेक चित्रपटांत उर्मिलाने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. उर्मिलाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचं झालं तर ९ फेब्रुवारी २०१३ रोजी उर्मिला बॉयफ्रेंड सुकिर्तबरोबर लग्नबंधनात अडकली. लग्नाच्या आठ वर्षांनंतर ३ ऑगस्ट २०२१ रोजी त्यांना पुत्रलाभ झाला आणि त्यांच्या आयुष्यात अथांग आला.