‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे काही विनोदी कलाकार बरेच चर्चेत आले. या कार्यक्रमात काम करणाऱ्या कलाकारांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली. इतकंच नव्हे तर त्यांचा चाहतावर्गही मोठा आहे. त्यातीलच एक कलाकार म्हणजे वनिता खरात. वनिताने नाटकांपासून तिच्या अभिनयक्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. मेहनतीच्या जोरावर तिने बॉलिवूडपर्यंत मजल मारली. शाहिद कपूरच्या कबीर सिंग चित्रपटात वनिताने साकारलेली मोलकरणीची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती.

हेही वाचा- Video : “कोण म्हणतंय मुलीकडची बाजू पडकी…”, लग्नाला ६ महिने पूर्ण झाल्यावर वनिता खरातने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

नुकतचं वनिताने तिच्या बॉलीवूडमधील कामांबाबत भाष्य केलं आहे. वनिता म्हणाली, “कबीर सिंग या चित्रपटात मी मोलकरणीची भूमिका साकारली होती. त्यामुळे हिंदीतील बरेचसे कास्टिंग एजन्सी मला ओळखतात. त्यांच्याकडे माझं प्रोफाईल आहे. पण ते लोक मला फक्त मोलकरणीच्याच भूमिकेसाठी मला बोलवतात. त्यामुळे मला सारखं वाटत की, मी एकदा मोलकरणीची भूमिका केली आहे. पण मला तीच भूमिका सारखी ऑफर होत राहिली तर मी कोणकोणत्या आणि किती मोलकरणीची भूमिका साकारू? त्यामुळे मी आता त्यांना नाही म्हणणं सुरु केलं आहे.”

वनिता पुढे म्हणाली, “मला वेगवेगळी पात्र साकारायला खूप आवडतात. कॉमेडी तर मी करतेच पण मला स्वत:ला चाचपाडून पाहायचं आहे. की मी अशा प्रकारचे पात्र साकारू शकते का?. मला नेहमी वाटतं की कलाकाराला एकाच साच्यात न ठेवता त्याला वेगवेगळ्या भूमिका द्यायला हव्यात. तरच ते वेगवेगळी कामं करु शकतात. कास्टिंग एजन्सीबाबतही मला तेच वाटतं. पण ते वेगवेगळ्या गोष्टींसाठी प्रयत्नच करत नाहीत. त्यांना एखादा डेटा मिळाला आणि एखाद्याला त्यांनी त्या भूमिकेत पाहिले तर त्याला तशाच प्रकारच्या भूमिका साकारायला बोलवलं जातं.”

हेही वाचा- ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील अंजीला वाढदिवशी बॉयफ्रेंडने केलं प्रपोज, अभिनेत्री व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे कलाकार नुकतेच अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. या कलाकारांमध्ये वनिता खरातचाही समावेश होता. तब्बल एक महिन्यांच्या दौऱ्यानंतर हे कलाकार काही दिवसांपूर्वी भारतात परतले आहेत. वनिताने आपल्या सोशल मीडियावर या दौऱ्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. त्यानंतर अनेकांनी हा कार्यक्रम पुन्हा सुरु करावा अशी मागणी केली होती. अखेर लवकरच या कार्यक्रमाला नवीन पर्वाला सुरुवात होणार आहे.