रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस १७’ मध्ये सहभागी झाल्यापासून अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या नात्यात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. या शोच्या फॅमिली वीकमध्ये अंकिता व विकीच्या आईने हजेरी लावली. यावेळी त्या दोघींनी या जोडप्याला सल्ले दिले. तसेच भांडण न करण्यासही सांगितलं. मात्र, घरातून बाहेर आल्यानंतर विकीच्या आईने मोठा खुलासा केला आहे. विकीने अंकिताशी लग्न करावं असं आपल्याला वाटत नव्हतं, असं रंजना जैन म्हणाल्या. इतकंच नाही तर त्यांनी अंकिता तिचा एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूतबद्दल बोलते, त्यावरही प्रतिक्रिया दिली.

अंकिता तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतबद्दल वारंवार बोलून प्रेक्षकांची सहानुभूती जिंकण्याचा प्रयत्न करत आहे, असं रंजना म्हणाल्या. “अंकिता सुशांतचे नाव घेत आहे. ती त्याचं नाव घेऊन स्वतःसाठी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, असं दिसतंय. सुशांत तर आता या जगात नाही,” असं अंकिताच्या सासूबाई ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर ‘सास बहू साजिश’ला म्हणाल्या.

जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहारिया काय काम करतो? २७ व्या वर्षी ‘इतक्या’ कोटींचा मालक आहे माजी मुख्यमंत्र्यांचा नातू

अंकिता घरात विकीला मारलं होतं, त्यावरही रंजना यांनी प्रतिक्रिया दिली. “हे चुकीचे आहे. आपण भारतात राहतो. तुझा नवरा देवता आहे, तू त्याला मारत आहेस,” असं त्या म्हणाल्या. सूनेबद्दल तक्रारी असल्या तरी शो तिनेच जिंकावा, असं त्यांना वाटतं. तिच सर्वात लोकप्रिय स्पर्धक आहे, त्यामुळे तीच बिग बॉस १७ ची विजेती व्हावी, अशी इच्छा विकीच्या आईने व्यक्त केली.

“दोघांच्या लग्नाला आमचा पाठिंबा नव्हता”, अंकिता लोखंडेच्या सासूबाईंनी मांडलं स्पष्ट मत; म्हणाल्या, “त्यांच्यातील भांडणं…”

View this post on Instagram

A post shared by Ankita Lokhande Jain (@lokhandeankita)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पिंकविला’ला दिलेल्या दुसर्‍या मुलाखतीत विकीच्या आईने सांगितलं की विकीने अंकिताशी लग्नाचा निर्णय घेतला, त्याला आपला पाठिंबा नव्हता. “विकीने अंकिताशी लग्न केलं. त्यांच्या लग्नाला आमचा पाठिंबा नव्हता. विकीने लग्न केलं आणि आता तो जबाबदारी घेण्यास तयार आहे. याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. आम्ही खूप काही पाहतोय पण आम्ही त्याला काहीच सांगितलं नाही. तो तिथे आहे तो त्याच्या नात्याची काळजी घेईल. मला विश्वास आहे की विकी तो त्याचं नातं सांभाळेल,” असं विकीची आई म्हणाल्या.