६ ऑक्टोबरपासून बिग बॉस १८ सुरू होणार आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही सलमान खान या रिॲलिटी शोचा होस्ट आहे. यंदाची थीम ‘टाइम का तांडव’ आहे. हा शो भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ या थीमवर आधारित असेल. बिग बॉस १८ चे घरही या थीमनुसार डिझाईन करण्यात आले आहे. या घरात लेण्या, किल्ले, शिल्पे, मातीची भांडी अशा गोष्टी पाहायला मिळणार आहेत.

या वर्षी बिग बॉसच्या घरात छुपे प्रवेशद्वार, छुपे दरवाजे, कॅमेरे आणि काही अशी ठिकाणं आहेत जी कदाचित सहज दिसणार नाहीत. गार्डनमध्ये प्रवेश करताच एक मोठा खांब दिसतो. तिथून एक रस्ता बिग बॉसच्या घरात जातो. बाथरुमची थीम तुर्की हमामपासून प्रेरित आहे आणि त्याच्या प्रवेशद्वारावर एक मोठा ट्रोजन हॉर्स आहे, तिथे बसण्यासाठी जागा आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’ने बिग बॉसच्या घराच्या व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचाBigg Boss Marathi 5 चा विजेता ठरवण्यासाठी आवडत्या स्पर्धकाला वोट कसे करायचे? जाणून घ्या

लिव्हिंग रूम खूप सुंदर आहे. इथे एका कोपऱ्यात बसायला जागा आहे आणि मध्यभागी एक मोठा डायनिंग टेबल आहे. स्वयंपाकघर एका गुहेसारखे डिझाइन केलेले आहे, तर बेडरूमचा लूक किल्ल्यासारखा आहे. या घरात तुरुंगदेखील आहे, जे स्वयंपाकघर आणि बेडरूमच्या मधे आहे. हे लक्झरी घर बनवण्यासाठी २०० कामगारांनी ४५ दिवस मेहनत घेतली आहे, असं आर्ट डायरेक्टर ओमंग कुमारने सांगितलं.

हेही वाचा – Bigg Boss 18: सलमान खानचा शो केव्हा, कुठे पाहता येणार? जाणून घ्या प्रिमियरची तारीख अन् स्पर्धकांची नावं

पाहा बिग बॉसच्या घराची झलक

‘बिग बॉस ओटीटी ३’ संपल्यानंतर या घराचे काम सुरू झाले. ओमंग म्हणाला, “सेट तयार करण्यासाठी ४५ दिवस लागले, ओटीटी नंतर लगेच काम सुरू केले. घराच्या डिझाईनसाठी अर्धा दिवस लागतो, पण मजले असतील तर त्यासाठी जास्त वेळ लागतो. सर्वात आधी ते काम करावे लागते. बेडरूममधील पायऱ्या ही यावर्षीची सर्वात क्लिष्ट आयडिया होती, कदाचित त्यामुळे यंदाच्या पर्वातील स्पर्धक कंटाळतील.”

हेही वाचा – Bigg Boss Marathi चा ग्रँड फिनाले विनामूल्य कधी व कुठे पाहता येणार? ‘या’ दिवशी ठरणार पाचव्या पर्वाचा विजेता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्व सोई-सुविधा असलेल्या या लक्झरी घरासाठी एक बजेट दिलेले असते, पण नेहमीच बजेटपेक्षा जास्त खर्च येतो, असं ओमंगने सांगितलं. बिग बॉस १८ चे प्रिमिअर रविवारी ६ ऑक्टोबर रोजी होणार असून हा शो कलर्स वाहिनी व जिओ सिनेमावर पाहता येईल.