अभिनेत्री विशाखा सुभेदार ही वर्षभराच्या ब्रेकनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील शुभविवाह या मालिकेद्वारे विशाखा सुभेदार ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबद्दल अनेकजण तिचे कौतुक करत आहे. तर काहींनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. नुकतंच विशाखा सुभेदारने या ट्रोलिंगवर भाष्य केले आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या नव्या वर्षात अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात येत्या १६ जानेवारीपासून शुभविवाह ही मालिका प्रक्षेपित होणार आहे. या मालिकेद्वारे विशाखा सुभेदार ही कमबॅक करणार आहे. यात ती दोन मुलांची आई असलेले पात्र साकारत आहे. विशाखा सुभेदार जवळपास दीड वर्षांनी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करत असल्याने अनेकजण तिचे कौतुक करत आहेत.
आणखी वाचा : वर्षभराच्या ब्रेकनंतर विशाखा सुभेदार करणार मालिकेत पुनरागमन, प्रोमो समोर

विशाखा सुभेदारने इन्स्टाग्रामवर या मालिकेचा पहिला प्रोमो शेअर केला आहे. बहिणीच्या स्वप्नासाठी आपलं आयुष्य पणाला लावणाऱ्या भूमीच्या त्यागाची गोष्ट यात दाखवली जाणार आहे. या पोस्टवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहे. विशाखाच्या या पोस्टवर एका नेटकऱ्याने कमेंट करत तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र तिने त्याला सडेतोड उत्तर दिले आहे.

विशाखा सुभेदारच्या या पोस्टवर एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे. “कलाकार म्हणून आपल्या सगळ्यांचा आदर आहे, परंतू आता काहीतरी नवीन हवं”, असे त्याने यात म्हटले आहे. त्यावर विशाखानेही त्याला खडे बोल सुनावले आहेत. “जसं बुलेट ट्रेननंतर जत्रा नवं होतं अगदी तसंच… हे माझं नवीन काम आहे… आणि आधी नीट तर सुरु होऊ दे. बघा आणि मग नकारात्मक कमेंट करा”, असे तिने त्याला उत्तर देताना म्हटले आहे.  

आणखी वाचा : ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा वाद मिटणार? ‘झी वाहिनी’कडून मोठा निर्णय; परिपत्रक केलं जारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Vishakha Subhedar
विशाखा सुभेदारचे उत्तर

“येतेय लवकरच.. “शुभविवाह ” घेऊन.. तुमच्या आशीर्वादाने,पुन्हा एकदा मालिकेच्या जगात,एका वेगळ्या भूमिकेत.. मायबाप प्रेक्षक..प्रेम राहू दया. चि. सौ. कां. भूमी आणि चि. आकाश यांचा ‘शुभविवाह’ मुहूर्ताची वेळ: सोमवार १६ जानेवारीपासून रोज दुपारी २:०० वाजता स्थळ: Star प्रवाहवर लग्नाला यायचं हं!” असे कॅप्शन तिने या प्रोमोला दिले आहे. या मालिकेत मधुरा देशपांडे, यशोमन आपटे, विशाखा सुभेदार, कुंजिका काळविंट, अभिजीत श्वेतचंद्र हे कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे.