‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४’ हा सोहळा काल, १७ नोव्हेंबरला मोठ्या दिमाखात पार पडला. अभिनेत्री तेजश्री प्रधान, ईशा केसकर व अभिजीत खांडकेकर यांनी या सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली. तसेच स्टार प्रवाह परिवातील कलाकारांनी जबरदस्त डान्स परफॉर्मन्स केला. शिवाय विशाखा सुभेदार व पंढरीनाथ कांबळे यांनी आपल्या विनोदीशैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवलं.

जुई गडकरी व अमित भानुशाली यांची प्रमुख भूमिका असलेली ‘ठरलं तर मग’ मालिका यंदाची ‘स्टार प्रवाह महामालिका’ ठरली. तसंच सर्वोत्कृष्ट आईचा पुरस्कार मुक्ता म्हणजे अभिनेत्री तेजश्री प्रधानला मिळाला. तर सर्वोत्कृष्ट खलनायिका हा पुरस्कार विभागून देण्यात आला. ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनी व ‘शुभविवाह’मधील रागिणी या दोघी सर्वोत्कृष्ट खलनायिका ठरल्या.

हेही वाचा- “माझ्या ५३ वर्षांच्या कारकिर्दीत…” ‘अ‍ॅनिमल’ दिग्दर्शकाच्या प्रत्युत्तरावर भडकले जावेद अख्तर, म्हणाले, “लाजिरवाणी गोष्ट…”

सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनेत्री विशाखा सुभेदारने एक खास पोस्ट लिहिली आहे, “वेगळा प्रवास, वेगळी भूमिका…आणि ‘सर्वोत्कृष्ट खलनायिका’ हे अवॉर्ड….रागिणी (मालिका- शुभविवाह) मिळालं..खूप आनंद झाला…थँक्यू निर्माते महेश तागडे. दिग्दर्शक भरत गायकवाड, विश्वास सुतार, आणि अनिरुद्ध शिंदे,संपूर्ण कथानक फुलवणारे शिरीश लाटकर दादा आणि मुखी संवाद पेरणाऱ्या मिथिला सुभाष ताई (रागिणीची आई) आणि माझे सहकलाकारविजय पटवर्धन, शीतल शुक्ला, यशोमन आपटे, मधुरा देशपांडे, अभिजीत श्वेतचंद्र , कुंजिका, काजल पाटील, अक्षयराज, मृणाल देशपांडे, मनोज कोल्हटकर, रुचिर, राजेश साळवी, सगळ्या सगळ्यांचे आभार. tell a tale production houseचा Hop अजित सावंत, स्वाती दरणे क्रिएटिव्ह हेड आणि स्टारप्रवाह. खूप आनंद आणि असेच प्रयत्न करीत राहीन. सोहळ्यात सादरीकरण करताना सुद्धा मज्जा आली.. ही संधी दिल्याबद्दल श्रीप्रसाद शिरसागर, चिन्मय कुलकर्णी (लेखक ) विशाल मोढवे आणि सतीश सर यांचे मनापासून आभार.”

हेही वाचा – स्टार प्रवाह परिवार पुरस्कार : ‘ठरलं तर मग’ने मारली बाजी! यंदाची सर्वोत्कृष्ट जोडी, सासू-सून, खलनायिका ठरली…; पाहा संपूर्ण यादी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, विशाखाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती ‘फुबाईफू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून घराघरात पोहोचली. तिनं या व्यतिरिक्त मालिका आणि चित्रपटात देखील काम केलं आहे. ‘फक्त लढ म्‍हणा’ (२०११), ‘४ इडियट्स’ (२०१२) आणि ‘अरे आवाज कोनाचा’ (२०१३), ‘ये रे ये रे पैसा’ (२०१८) आणि ‘६६ सदाशिव’ (२०१९) अशा काही चित्रपटांमध्ये ती झळकली आहे.