आपल्या आवडत्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी अनेकांना कुटुंबाचा विरोध पत्करावा लागतो. टीव्हीवरील एक अभिनेत्री अशी आहे जिने अभिनयक्षेत्रात करिअर केल्यानंतर कुटुंबाकडून मारण्याची धमकी मिळाली होती. या अभिनेत्रीने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ती टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिला कुटुंबाने केलेल्या विरोधाबद्दल जाणून घेऊयात.

“फरहानने मुलींच्या जन्म प्रमाणपत्रात धर्माच्या रकान्यात…”, जावेद अख्तर यांचा खुलासा

या अभिनेत्रीचं नाव निकुंज मलिक आहे. ‘राहुल दुल्हनिया ले जाएंगे’ या शोची ती फायनलिस्ट होती. या शोमुळे लोकप्रिय झालेल्या निकुंजने नंतर अनेक शोमध्ये काम केलं. निंकुजने ‘सुफियाना प्यार मेरा’, ‘कलीरें’, ‘प्रेम की पहेली चंद्रकांता’, ‘२४’ आणि ‘अदालत’ सारख्या शोमध्ये आपल्या दमदार अभिनयाची जादू दाखवली.

‘एबीपी लाइव्ह’ने दिलेल्या वृत्तानुसार, ३० ऑक्टोबर १९८९ रोजी हरियाणामध्ये जन्मलेल्या निकुंजने टीव्हीवर लोकप्रियता मिळवण्यानंतर आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात कंगना रणौतबरोबर ‘रिव्हॉल्वर रानी’ या बॉलीवूड चित्रपटातून केली होती. तिने ‘शौकीन्स’मध्येही पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. टीव्ही व सिनेमामध्ये काम करणाऱ्या निकुंजला घरातूनच विरोध झाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१३ मध्ये निंकुजने आपल्या काकावर मारहाण केल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला होता. तिच्या कुटुंबातील काही लोकांना तिचे अभिनयसृष्टीतील काम करणे आवडत नाही, असंही तिने सांगितलं होतं. निकुंजने याबद्दल पोलिसांकडे तक्रार केली होती. ती जाट कुटुंबातील आहे त्यामुळे तिचे काका तिच्यावर फिल्म इंडस्ट्री सोडण्यासाठी दबाव आणत असल्याचं तिने तक्रारीत म्हटलं होतं. त्यावेळी निकुंजने केलेल्या आरोपांची खूप चर्चा झाली होती.