टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘जोधा अकबर’ मध्ये अकबरची भूमिका साकारून अभिनेता रजत टोकसला खूप लोकप्रियता मिळाली. रजत बऱ्याच वर्षांपासून छोट्या पडद्यापासून दूर आहे. त्यामुळे चाहते त्याच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण रजत टोकस मात्र सोशल मीडियावरूनही गायब आहे.

‘जोधा अकबर’ ही मालिका प्रचंड हिट झाली होती. अकबरच्या भूमिकेतील रजत टोकसने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. या मालिकेने रजतला लोकप्रियता मिळवून दिली. एकेकाळी छोटा पडदा गाजवणारा रजत मागील ६ वर्षांपासून कोणत्याच शोमध्ये झळकला नाही. तो शेवटचा ‘नागिन’ मालिकेत सहायक भूमिकेत दिसला होता.

रजतने २०१९ मध्ये मार्वल कॉमिक्सच्या निर्मात्यांशी संपर्क साधून वॉल्व्हरिन म्हणून त्याला कास्ट करण्यात यावं, यासाठी एक मोहीम सुरू केली होती. या मोहिमेला सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांकडून मोठा पाठिंबा मिळाला. पण रजतला भूमिका मिळाली नाही.

रजतचे इन्स्टाग्राम अकाउंट झालेले हॅक

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०२३ मध्ये रजत टोकसचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाले होते. त्यामुळे तो काही काळ सोशल मीडियावर सक्रिय नव्हता. त्यानंतर तो सोशल मीडियावर परत आला होता. नंतर पुन्हा त्याने सोशल मीडियावर अपडेट्स शेअर करणं थांबवलं. ४ लाख फॉलोअर्स असलेल्या रजतची शेवटची पोस्ट १९ जुलै २०२४ ची आहे. त्यानंतर त्याच्या अकाउंटवरून कोणतीही पोस्ट करण्यात आलेली नाही.

Where is Rajat Tokas : सध्या रजत कुठे आहे, काय करतो? याबद्दल कुणाला काहीच माहिती नाही. तो सोशल मीडियावर व मनोरंजन विश्वात सक्रिय नाही. त्यामुळे त्याचे चाहते निराश झाले आहेत. रजतला चांगल्या व मुख्य भूमिका मिळत नाहीयेत, त्यामुळे तो छोट्या पडद्यापासून दूर आहे, असं म्हटलं जातंय. तर दुसरीकडे तो कुटुंबाबरोबर वेळ घालवतोय, अशाही चर्चा आहेत.

रजत टोकसच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास त्याने २०१५ मध्ये २४ व्या वर्षी त्याची गर्लफ्रेंड सृष्टी नय्यरशी लग्न केलं. रजतने गुपचूप लग्न केलं होतं, त्याच्या लग्नाबद्दल इंडस्ट्रीत कोणालाही काहीच कल्पना नव्हती.