‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’चं नवं पर्व सध्या चांगलं गाजत आहे. या नव्या पर्वातील लिटिल चॅम्प्सने त्यांच्या आवाजाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे. त्यापैकी एक म्हणजे ऋचा घांगरेकर. ऋचाने आवाजाबरोबरच तिच्याकडे असलेल्या ज्ञानाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अशा या चिमुकल्या ऋचाचा सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे; ज्यामध्ये तिने नवरात्र, दसरा का साजरा करतात? शस्त्रांची पूजा का केली जाते? या प्रश्नांची उत्तर दिली आहेत.

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’मधील ‘या’ अभिनेत्रीला अचानक काढलं होतं एका लोकप्रिय मालिकेतून; किस्सा सांगत म्हणाली, “माझ्या आई-वडिलांना मानसिक…”

‘झी मराठी’च्या इन्स्टाग्राम पेजवर ऋचाचा हा व्हायरल व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये सूत्रसंचालिका मृण्मयी देशपांडे ऋचाला बोलावते आणि विचारते की, ‘नवरात्र का साजरी केली जाते? यामागची तुला गोष्ट माहित असेल ना. मग सांग.’ त्यानंतर ऋचा नवरात्र, दसरा साजरा करण्यामागची गोष्ट सांगते. तसेच ती दसऱ्याला शस्त्रांची पूजा का करतात? यामागची देखील गोष्ट सांगताना पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – “राज ठाकरे मुख्यमंत्री नाहीत हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, त्यांचं नाही” अभिनेत्री तेजस्विनी पंडितचं वक्तव्य

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’मधील ‘या’ अभिनेत्रीने दिली होती ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेसाठी ऑडिशन, पण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऋचाचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून नेटकरी तिचं कौतुक करत आहेत. “किती छान सांगते”, “ऋचा तू खूप हुशार मुलगी आहे. मला खपूच आवडते बेटा तू”, “ऋचापेक्षा तिच्या आई-वडिलांच कौतुक जास्त आहे की, त्यांनी तिला योग्य पद्धतीने सांगितलं”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.

हेही वाचा – “त्यांचे आई-वडील आमच्यासारखे म्हातारे होण्याआधीच वरती…” ऐश्वर्या नारकर यांचं ट्रोलर्सना उत्तर, म्हणाल्या…

याआधी ऋचाचे बरेच असे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. गणपती बाप्पाला २१ मोदकांचा नैवेद्य का दाखवतात? याची देखील तिने गोष्ट सांगितली होती. ही गोष्ट ऐकून मृण्मयी देशपांडे थक्क झाली होती.