Marathi Actress Buy New Car : गेल्या काही महिन्यांत मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी नव्या गाड्या खरेदी करत स्वप्नपूर्ती केली. मागील काही दिवसांत मराठी इंडस्ट्रीमधील गौरव मोरे, जान्हवी किल्लेकर, यशोमन आपटे, संजय नार्वेकर, हेमल इंगळे अशा काही कलाकारांनी नव्या गाड्या खरेदी केल्या. नव्या गाड्या खरेदी केल्याच्या पोस्ट किंवा व्हिडीओ त्यांनी आपापल्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले. अशातच आता यात आणखी एका अभिनेत्रीचं नाव सामील होत आहे.
मराठी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता नवनाळे हिने नुकतीच एक आलिशान कार खरेदी केली आहे. या नव्या गाडीच्या खरेदीचा व्हिडीओ तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. प्राजक्ताही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक स्टायलिश लूक्समधील फोटो शेअर करत असते. तसंच तिला व्यायामाची विशेष आवड असून जिममधील व्हिडीओही ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
अशातच प्राजक्ताने नव्या गाडीच्या शेअर केलेला व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. प्राजक्ताने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती सहकुटुंब सहपरिवार नवी गाडी खरेदी करायला गेली असल्याचं पाहायला मिळत आहे. यात प्राजक्ता गाडी खरेदीच्या कागदपत्रांवर सही करताना आणि नव्या गाडीची पूजा करतानाही पाहायला मिळत आहे. याशिवाय व्हिडीओमध्ये तिच्या चेहऱ्या नव्या गाडीच्या खरेदीचा आनंद आणि अभिमानही पाहायला मिळत आहे.
प्राजक्ता नवनाळे इन्स्टाग्राम व्हिडीओ
हा व्हिडीओ शेअर करत प्राजक्ताने तिच्या आनंदी भावना व्यक्त केल्या आहेत. या व्हिडीओखालील कॅप्शनमध्ये ती असं म्हणते, “आई शप्पथ स्वप्न पूर्ण होताना स्वतःच्या डोळ्यांनी बघण्यात मज्जाचं वेगळी आहे. देवा, तुझे खूप खूप आभार. सदैव माझ्या पाठीशी असणाऱ्या आणि मला कायम पाठिंबा देणाऱ्या कुटुंबाचेही खूप खूप आभार. तसंच यानिमित्ताने मी मलासुद्धा धन्यवाद म्हणते. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ”.
प्राजक्ता नवनाळेचं कलाकारांनी केलं अभिनंदन
याशिवाय तिने व्हिडीओवर असं लिहिलंय, “कष्ट इतक्या शांततेत करा की, तुमचं यश धिंगाणा घालेल”. प्राजक्ताने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी कमेंट्स करत अभिनेत्रीचं कौतूक केलं आहे. विशाल निकम, आकाश नलावडे, सुयश टिळक, सुमित पुसावळे, सिद्धार्थ खिरीड, अक्षया हिंदळकर, निखिल बने यांसह अनेक कलाकारांनी तिचं अभिनंदन केलं आहे.
दरम्यान, प्राजक्ता नवनाळेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती साध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत विशाल निकम आणि पूजा बिरारी ही राया-मंजिरीच्या मुख्य भूमिकांत आहेत. तर प्राजक्ता या मालिकेत मंजिरीची बहीण ऋतुजा ही भूमिका साकारत आहे. याआधी प्राजक्ताने ‘जीव माझा गुंतला’ तसंच ‘मुलगी झाली हो’ या मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.