Yogita Chavan Saourabh Chaughule New Videos: ‘जीव माझा गुंतला’ मालिकेत मल्हार व अंतरा या मुख्य भूमिका साकारणारे सौरभ चौघुले व योगिता चव्हाण सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. योगिता व सौरभ यांनी दीड वर्षापूर्वी लग्न केलं होतं, पण आता ते विभक्त झाले आहेत, असं म्हटलं जातंय. घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान योगिता चव्हाण व सौरभचे व्हिडीओ समोर आले आहेत.

सौरभ चव्हाणने अद्याप घटस्फोटाच्या चर्चांवर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. तर योगिता चव्हाणने वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीच बोलायचं नाही, असं घटस्फोटाबाबत विचारल्यावर म्हटलंय. याचदरम्यान, दोघेही एका कार्यक्रमानिमित्त एकाच ठिकाणी पोहोचले.

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाचा ग्रँड प्रीमिअर सोहळा गुरुवारी, ३० ऑक्टोबर रोजी पार पडला. या सोहळ्याला योगिता व सौरभ दोघांनीही हजेरी लावली. पण दोघेही एकत्र आले नव्हते. आधी सौरभ या कार्यक्रमात आला, तर नंतर योगिता आली.

पाहा व्हिडीओ

योगिताने या प्रिमियरसाठी खास साडी नेसली होती. तर सौरभ कॅज्युअल लूकमध्ये पोहोचला होता. आधी कार्यक्रमांना एकत्र जाणारे सौरभ व योगिता एकाच कार्यक्रमात वेगवेगळे पोहोचल्याने त्यांच्या घटस्फोटांच्या चर्चा खऱ्या असल्याचं बोललं जातंय. पण सौरभ व योगिता मात्र अद्याप याबद्दल बोलणं टाळत आहेत.

‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत एकत्र काम करताना सौरभ व योगिता यांच्यात जवळीक वाढली. सौरभ योगिता नंतर डेट करू लागले व एकत्र रील्स बनवू लागले. सौरभने प्रपोज केल्यावर योगिताने थोडा वेळ घेतला आणि होकार दिला. दोघांनी डिसेंबर २०२४ पर्यंत लग्न करायचं ठरवलं. पण अचानक योगिताने लग्नाचा निर्णय घेतला आणि सगळ्यांच्या तारखा जुळवून दोघांनी ३ मार्च २०२४ रोजी लग्न केलं. आता त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत आहेत.