गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजारापणात वाढ होत आहे. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच अनेक कलाकार आजारी पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नुकतंच मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का सरकटे आजारी पडली आहे. तिने पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे.

अनुष्का सरकटे ही सध्या ‘३६ गुणी जोडी’ या मालिकेच्या प्रमुख भूमिकेत झळकत आहे. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिचा सहकलाकार अभिनेता निखिल चव्हाणचे आभारही मानले आहेत.
आणखी वाचा : “सर्वांची नजर माझ्यावर” शशांक केतकरच्या ‘त्या’ फोटोवर पत्नीची कमेंट, म्हणाली “आणि तुझी…”

अनुष्का सरकटे हिला फूड इन्फेक्शन झालं आहे. त्याबद्दल इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिताना ती म्हणाली, “जेव्हा तुम्हाला फूड इन्फेक्शन झालेलं असतं, तुम्ही कामावर असता आणि तुमच्या कामाचे ठिकाण हे अशा ठिकाणी असतं जिथे झोमॅटो आणि स्विगी पोहोचू शकत नाही. त्यावेळी तुम्हाला कोणीतरी दही-भाताचा डब्बा आणून देतं, तेव्हा फार बर वाटतं. धन्यवाद निखिल.”

Anushka Sarkate
अनुष्का सरकटे

आणखी वाचा : “…मग माझ्याच बाबतीत असं का घडावे”, प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली “या जन्मी नातेवाईक…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अनुष्का सरकटे ही झी मराठीवरील ‘कारभारी लय भारी’ या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आली. अनुष्का सरकटेने यापूर्वी ‘श्री लक्ष्मी नारायण’ मालिकेत प्रमुख लक्ष्मीची भूमिका साकारली होती. ‘मी तुझीच रे’ या मालिकेतून अनुष्काने छोटया पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेत तिने दिव्याची भूमिका साकारली होती.