‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम सतत काही ना काही कारणांनी चर्चेत आहे. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वाला प्रेक्षकांची अधिकाधिक पसंती मिळताना दिसत आहे.या शोच्या आधीच्या दोन पर्वांनाही प्रेक्षकांचा बराच प्रतिसाद मिळाला होता. आताही या शोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मात्र आता लवकरच ‘खुपते तिथे गुप्ते’हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अभिनेता अवधूत गुप्तेने याबद्दलची पोस्ट शेअर केली आहे.

अवधूत गुप्तेने नुकतंच एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात तो खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमासाठी मेकअप करताना दिसत आहे.यानंतर तो मंचावर जाऊन पूजा करताना, नारळ फोडताना दिसत आहे. यावेळी कार्यक्रमाच्या बॅकस्टेजला असणारी मंडळीही दिसत आहेत. यात तो अँकरिंगची तयारीही करत असल्याचे पाहायला मिळते.
आणखी वाचा : “राज ठाकरेंच्या घरी गेलो तेव्हा…”, कोकण हार्टेड गर्लने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली “ते मुख्यमंत्री…”

“थोडे विसरावे लागते .. आठवण्यासाठी.. दूर जावे लागते पुन्हा भेटण्यासाठी!ह्या पर्वाचा शेवटचा भाग.. येत्या रविवारी!!”, असे कॅप्शन अवधूत गुप्तेने दिले आहे. यात त्याने खुपते तिथे गुप्ते कार्यक्रम सहभागी झालेल्या अनेकांना टॅगही केले आहे.

आणखी वाचा : “…म्हणून मी बाजूला झाले”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये परतण्याबद्दल विशाखा सुभेदार यांचं स्पष्ट वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान येत्या रविवारी १७ सप्टेंबरला खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. या पर्वाचा पहिला भाग ४ जून २०२३ रोजी प्रदर्शित झाला होता. या कार्यक्रमात राज ठाकरे, नारायण राणे, संजय राऊत, उर्मिला मातोंडकर, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, डॉ. अमोल कोल्हे, समीर वानखेडे, श्रेयस तळपदे, सई ताम्हणकर, वंदना गुप्ते, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, अमृता खानविलकर, अभिजीत बिचुकले ही मंडळी सहभागी झाली होती. येत्या भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे सहभागी होणार आहेत.