Zee Marathi Awards 2024 : ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. यंदा वाहिनीला २५ वर्षे पूर्ण होत असल्याने हा पुरस्कार सोहळा २६ व २७ ऑक्टोबर असे दोन दिवस प्रसारित केला जाणार आहे. या सोहळ्याला यावर्षी जुन्या मालिकांचे कलाकार देखील उपस्थित राहणार आहेत. सध्या याचे अनेक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशाच एका भावुक प्रोमोने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

‘झी मराठी’ वाहिनीवर ( Zee Marathi Awards ) १३ फेब्रुवारीपासून ‘शिवा’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. यामध्ये अभिनेत्री पूर्वा फडके आणि अभिनेता शाल्व किंजवडेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गेल्या काही महिन्यात या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारण्यासाठी पूर्वा फडकेने खास केस कापून बॉबकट हेयरस्टाइल केली आहे. तिच्या याच मेहनतीला अखेर पुरस्काराच्या रुपात पोचपावती मिळाली आहे.

‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यात ‘शिवा’ फेम पूर्वा झाली भावुक

‘झी मराठी’ ( Zee Marathi Awards ) वाहिनीने नुकत्याच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये पूर्वा फडकेला पुरस्कार मिळाल्याचं समोर आलं आहे. मात्र, तिला नेमका कोणता पुरस्कार देण्यात आलाय हे स्पष्ट झालेलं नाही. हा पुरस्कार मिळताच अभिनेत्री प्रचंड भावुक झाली होती.

पूर्वा फडकेला पुरस्कारासह ‘झी मराठी’ने एक खास भेटवस्तू दिली. ही भेटवस्तू म्हणजे तिच्या आई-बाबांच्या आठवणींना उजाळा देणारी फोटोफ्रेम! या फ्रेममध्ये वाहिनीने पूर्वाच्या हातात ‘झी मराठी’ची ट्रॉफी असलेला फोटो एडिट करून लावला आहे.

हेही वाचा : Video : जडतो तो जीव…; पुरस्कार सोहळ्यात प्रिया बापटने गायलं २५ वर्षे जुन्या मालिकेचं अजरामर गीत, सर्वत्र होतंय कौतुक

Zee Marathi Awards
पुरस्कार मिळताच शिवा झाली भावुक ( Zee Marathi Awards )

आई-वडिलांची माया नेहमीच आपलं मन हळवं करते. अगदी तसंच काहीसं पुरस्कार स्वीकारताना पूर्वाच्या बाबतीत घडलं. पुरस्कारची ट्रॉफी आणि आई-वडिलांबरोबरचा फोटो पाहून पूर्वाला अश्रू अनावर झाले होते. याबाबत सांगताना अभिनेत्री म्हणाली, “मी आधी माझ्या आई-बाबांबरोबर बसून ‘झी मराठी अवॉर्ड्स’चे ( Zee Marathi Awards ) नॉमिनेशन, मुख्य सोहळा, झी गौरव पुरस्कार पाहायचे. तेव्हा ते होते…पण, आज हा पुरस्कार मिळाला, त्यांची खूप इच्छा होती हे अवॉर्ड मिळावं. आज आई-बाबा असते तर त्यांना छान वाटलं असतं.”

हेही वाचा : “वस्तू मिळतात अन्…”, अक्षयाने साड्यांच्या दुकानात लावली हटके ‘पुणेरी पाटी’! पाठकबाईंनी शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोने वेधलं लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भावुक झालेल्या पूर्वाला यावेळी मुक्ता बर्वेने धीर दिल्याचं पाहायला मिळालं. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत पूर्वाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.