Kamali fame Asha Shelar sang a song: झी मराठी पुरस्कार सोहळा लवकरच पार पडणार आहे. येत्या ११ आणि १२ ऑक्टोबरला हा सोहळा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. आता या सोहळ्याच्या निमित्ताने झी मराठी वाहिनीवरील कलाकारांचे इतर कला गुणही पाहायला मिळतात.
झी मराठी पुरस्कार सोहळ्यात व्हायफळ या पॉडकास्ट सेशन पाहायला मिळत आहे. यामध्ये प्रत्येक मालिकेतील विविध कलाकार हजेरी लावत असल्याचे दिसत आहेत. यावेळी ते त्यांच्या भूमिकांबद्दल, तसेच भूमिकेमुळे त्यांच्या खऱ्या आयुष्यात काही बदल झाले का, त्यांचे आवडते पदार्थ अशा अनेकविध गोष्टींबाबत ते बोलत असल्याचे दिसत आहेत. याबरोबरच काही कलाकार गाणीदेखील म्हणत असल्याचे पाहायला मिळत आहेत.
यामध्ये सावळ्याची जणू सावली मालिकेत काम करणारी प्राप्ती रेडकर, तारिणी मालिकेतील तारिणीची भूमिका साकारणारी शिवानी सोनार तसेच आता कमळी मालिकेतील कामिनी म्हणजेच आशा शेलारदेखील दिसत आहेत. आता आशा शेलार यांचा एक व्हिडीओ झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केला आहे
या व्हिडीओमध्ये आशा शेलार यांनी ‘कसं काय पाटील बरं हाय का…’ हे गाणे गायले आहे. त्यांच्या आवाजातील चढ उतार लक्ष वेधून घेत आहे. त्यांच्या या गाण्याचे सोशल मीडियावर कौतुक होताना दिसत आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधानने, “वाह!आशा ताई”, अशी कमेंट करत त्यांचे कौतुक केले आहे. तेजश्री व आशा शेलार यांनी ‘होणार सून मी या घरची’ या लोकप्रिय मालिकेत एकत्र काम केले आहे. आई आणि मुलीच्या भूमिकेत त्या दिसल्या होत्या. दोघींच्यादेखील भूमिका चांगल्याच गाजल्या होत्या.
नेटकरी काय म्हणाले?
याबरोबरच सावळ्याची जणू सावली मालिकेत भैरवीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मेघा धाडेने “वाह! किती मस्त”, असे लिहित कौतुक केले आहे. कलाकारांबरोबरच नेटकऱ्यांनी अभिनेत्रीचे कौतुक केले आहे. ” ताई, एवढं सुंदर गात आहात. आवाजातील चढ उतार खुप छान. खलनायिका म्हणून असणारी तुमची मनातील छबी यामुळे बदलुन गेली. “, “उत्तम”, “वाह! तु्म्ही इतके छान गाता हे माहित नव्हतं.”, “अप्रतिम”, “अतिसुंदर”, “कमाल”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. तसेच अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.



आशा शेलार सध्या कमळी मालिकेत कामिनी ही भूमिका साकारत आहे. कामिनी ही भूमिका नकारात्मक आहे. जी कमळी व तिच्या आईला सातत्याने त्रास देते. सतत काही ना काही कट कारस्थान करते. याबरोबरच, तिची नात अनिकासुद्धा जेव्हा वाईट गोष्टी करते, तेव्हा तिला प्रोत्साहन देते. कमळी मालिकेत सतत नवीन ट्विस्ट येताना दिसतात. नुकतेच कमळीने अनिकाविरुद्ध कॉलेजमधील आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.