Kamali Upcoming Twist: हुशार, संस्कारी, स्वप्नांसाठी धडपड करणारी, आईवर खूप प्रेम असलेली, चांगल्याशी चांगलं, तर वाईट वागणाऱ्यांना धडा शिकवणारी, संकटातून मार्ग काढणारी कमळी आता प्रेक्षकांना आवडू लागली आहे.

सिद्धटेकसारख्या छोट्या गावातील ही कमळी मुंबईसारख्या शहरात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहते. मात्र, भूतकाळ वाईट असल्याने तिची आई तिला मुंबईत जाण्यापासून अडवते. तरीही स्वत:ची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कमळी मुंबईत जाते.

तिथे तिला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. अनिका, तिची आई व तिची आजी तिला सतत विविध मार्गांनी त्रास देण्याचा प्रयत्न करतात. त्या सगळ्यांतून कमळी काहीतरी मार्ग काढते. या संपूर्ण प्रवासात तिची मैत्रीण निंगी तिच्याबरोबर असते. त्याबरोबरच हृषीदेखील तिला वेळोवेळी मदत करतो.

थिएटरमध्ये मुले काढणार कमळीची छेड

आता कमळीला एक मुलगा त्रास देत असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. झी मराठी वाहिनीने ‘कमळी’ मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, कमळी आणि थिएटरमध्ये ‘आता थांबायचं नाय’ हा चित्रपट पाहत आहेत. त्या चित्रपटाचा आनंद घेत असल्याचे दिसते. तिच्याबरोबर हृषी, अनिकादेखील दिसत आहे.

कमळी चित्रपट पाहत असताना मागच्या रांगेत बसलेला एक मुलगा तिच्या खुर्चीला पायाने लाथ मारतो. हे पाहिल्यावर कमळी घाबरते, तर अनिकाला आनंद होतो. ती हसताना दिसते. तो मुलगा पुन्हा कमळीला लाथ मारतो. हे पाहून हृषीचा संताप अनावर होतो. तो त्या मुलाला विचारतो की, लाथा का मारताय? त्यावर तो मुलगा उद्धटपणे हृषी म्हणतो की, त्यामध्ये माझी काही चूक नाही. या वेड्या मुलीलाच खुर्चीवर नीट बसता येत नाहीये.

प्रोमोमध्ये पुढे दिसते की, हृषी त्या मुलाला मारतो. हे पाहून त्या मुलाला मित्र पुढे येतो; मात्र हृषी त्यालादेखील गप्प बसवतो. हृषी रागात असल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे हृषीची आई त्याच्या वहिनीला हृषीबाबत विचारते. तो कुठे आहे, असे विचारल्यावर त्याची वहिनी आईला सांगते की, तो जिथे कुठे आहे, तिथे तो ठीक आहे.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने ‘थिएटरमध्ये कमळीची छेड काढणाऱ्या मुलांना हृषी घडवणार अद्दल’, अशी कॅप्शन दिली आहे. आता मालिकेत पुढे काय होणार, हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक असल्याचे दिसत आहे.