Lakshmi Niwas upcoming Twist: ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत सतत नवीन वळण येताना दिसते. मालिकेत जयंत-जान्हवी, लक्ष्मी-श्रीनिवास, सिद्धू-भावना, हरिश-सिंचना आणि मालिकेतील इतर पात्रांच्या आयुष्यात सतत काही ना काही घडताना दिसते.
काही दिवसांपूर्वी जयंतच्या त्रासाला कंटाळून जान्हवीने समुद्रात उडी मारली होती.जयंतला ती तिथे सापडली नसल्याने तिचा मृत्यू झाला असा त्याचा समज झाला. त्याने जान्हवीच्या घरीदेखील हेच सांगितले. दुसरीकडे जान्हवी किनाऱ्यावर आली. त्यानंतर तिने पुन्हा जयंतच्या जाळ्यात सापडू नये, यासाठी घरी न जाण्याचा निर्णय घेतला.
यादरम्यानच, तिने विश्वाच्या वडिलांचा अपघात होण्यापासून त्यांना वाचवले. विश्वाचे वडील तिला घरी घेऊन आले. जान्हवीने कोणालाच तिची खरी ओळख सांगितली नाही. स्वत:चे नाव तिने तनुजा असे सांगितले. जान्हवी विश्वाच्या घरी राहत आहे. मात्र, अद्याप त्यांची भेट होऊ शकली नाही.
‘लक्ष्मी निवास’ मालिकेत ट्विस्ट
आता झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर लक्ष्मी निवास मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते सई विश्वाला घरात आलेल्या पाहुणीला काही हवं नको ते विचारायला सांगते. विश्वाला सई म्हणते, “अरे, आपल्याकडे कोणीतरी राहायला आलंय. काय हवं नको ते बघायला नको का?” सईचे बोलणे ऐकून विश्वा जान्हवीच्या खोलीचा दरवाजा वाजवतो. जान्हवी भीत दरवाजाकडे येते. ती दरवाजाला हात लावते. विश्वाला जान्हवीबरोबरचे कॉलेजमधील काही क्षण आठवतात. तितक्यात जान्हवी कडी उघडते. ती बाहेर बघते आणि तिला भीती वाटते.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की विश्वा आणि सई दरवाजा उघडून खोलीत येतात. तेव्हा जान्हवीचे तोंड त्यांच्या विरुद्ध दिशेला असते. त्यामुळे जान्हवी व विश्वाची भेट होते की नाही, हे पाहायला मिळत नाही.
आता हा प्रोमो शेअर करताना, झी मराठी वाहिनीने, “सईमुळे जान्हवी व विश्वाची भेट होणार का?”, अशी कॅप्शन दिली आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, जान्हवीने स्वत:ची ओळख लपवण्यासाठी तिच्या नावासह तिचा लूकही बदलला आहे. आता विश्वाची आणि तिची भेट होणार का?, जान्हवी तिच्या सगळ्यात जवळच्या मित्राला सत्य सांगू शकणार का? विश्वा व जान्हवीची भेट झाल्यानंतर मालिकेत ट्विस्ट येणार का, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
आता लक्ष्मी-श्रीनिवास, जयंत व इतर कुटुंबियांना जान्हवी जिवंत असल्याचे सत्य कधी समजणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
