Lakshmi Niwas fame Aanandi dance on Chandra song: ‘लक्ष्मी निवास’ या महामालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सुरूवात केली आहे. छोटी-छोटी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी धडपडणारे मध्यमवर्गीय कुटुंबातील लक्ष्मी व श्रीनिवास प्रेक्षकांना प्रेरणा देतात. संतोष, जान्हवी, भावना, व्येंकी, हरीश, मंगल या मुलांची ते काळजी घेतात, त्यांच्या अडचणींच्या वेळी मदत करतात.
ज्यावेळी संतोष, हरिश, मंगल पैशासाठी लोभीपणा करतात, वेगळे मार्ग अवलंबतात, तेव्हा ते त्यांना शिक्षा देतात,प्रसंगी त्यांना घरातून बाहरे काढतात. जान्हवी व भावना या मुलींवर त्यांचे खूप प्रेम असल्याचे दिसते. मालिकेतील सर्वच पात्रे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या सगळ्यांबरोबर मालिकेतील आणखी एक पात्र सर्वांचे लक्ष वेधून घेते. भावनाची मुलगी आनंदी सर्वांची लाडकी असल्याचे दिसते.
ज्या श्रीकांतबरोबर भावनाचे लग्न होणार होते, त्याची आनंदी ही मुलगी आहे. पण, लग्नादिवशीच अपघातात श्रीकांतचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर भावनाने आनंदीला मुलगी म्हणून स्वीकारले. आनंदीमुळे भावना आई झाली. आनंदीला आई मिळाली. भावनाच्या घरच्यांनीदेखील आनंदीला त्यांच्या कुटुंबात सामावून घेतले. पण संतोष अनेकदा आनंदीमुळे खर्च वाढला असे अनेकदा म्हणताना दिसतो.
चिमुकल्या आनंदीने केला अमृता खानविलकरबरोबर ‘चंद्रा’ गाण्यावर डान्स
‘झी मराठी’ वाहिनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की सुंदर साडी नेसली आहे. तिच्याबरोबर मंचावर अमृता खानविलकरदेखील आहे. आनंदी अमृताच्या चंद्रा गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. अमृतादेखील तिला साथ देताना दिसत आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना झी मराठी वाहिनीने छोट्या आनंदीचं मोठं स्वप्न पूर्ण होणार असे लिहिले आहे. तर प्रेक्षकांमध्ये बसलेल्या लक्ष्मी व श्रीनिवास यांच्या चेहऱ्यावर आनंदीविषयीचं कौतुक दिसत आहे.
आता हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत आनंदीचं कौतुक केलं आहे. ‘खूप छान बाळा’, ‘खूप गोड’, ‘छोटी चंद्रा’, ‘सुंदर’, ‘खूप छान’, ‘मस्त डान्स केलास आनंदी’, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, आता झी मराठी पुरस्कार सोहळ्यात आणखी काय गमती जमती पाहायला मिळणार, तसेच, लक्ष्मी निवास मालिकेत पुढे काय घडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.