Lakshmi Niwas upcoming twist: ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील सिद्धू व भावनाची जोडी आता लोकप्रिय ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. गाडे पाटलांच्या घरात भावना एकटी पडली असली तरी सिद्धू तिला वेळोवेळी साथ देतो. तिच्याबरोबर राहतो. तिला मदत करतो.
भावना घेणार दुर्गेचा अवतार
सुरुवातीला भावनाला सिद्धूचा राग येत असे. आता मात्र, त्यांच्यात चांगली मैत्री झाल्याचे पाहायला मिळत आहे. भावनाला सिद्धूच्या सतत तिच्याबरोबर असण्याची सवय झाली आहे. मालिकेत दाखविल्याप्रमाणे, रवीने सिद्धूला किडनॅप केले आहे. त्याला शोधण्यासाठी भावना प्रयत्न करत आहे.
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर लक्ष्मी निवास मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की सिद्धू मोठ्याने ओरडत आहे. सिद्धूला ज्या ठिकाणी किडनॅप केले आहे, तिथे भावना पोहोचते. प्रोमोमध्ये पुढे सिद्धूची सुटका झाल्याचे दिसते. गुंड जेव्हा सिद्धूला पुन्हा पकडण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा भावना देवीसमोरचे त्रिशूल गुंडाच्या अंगावर फेकते. प्रोमोच्या शेवटी एक गुंड खाली पडलेला असून सिद्धूने रुद्रावतार धारण केल्याचे दिसत आहे. तसेच तिच्या त्रिशुल दिसत आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “दृष्टांचा संहार करत भावना घेणार दुर्गेचा अवतार” अशी कॅप्शन दिली आहे.
लक्ष्मी निवास मालिकेत अनेक ट्विस्ट सध्या पाहायला मिळत आहे. हरिश सिंचनासह तिच्या माहेरी जाऊन राहत आहे. त्यामुळे लक्ष्मी व श्रीनिवास त्याच्यावर नाराज आहेत. सिंचनाच्या घरचे सतत हरिशचा अपमान करत असल्याचे दिसते. पण, सिंचना तिच्या हट्टामुळे माहेरी राहत आहे.
दुसरीकडे, आजीमुळे जान्हवी दूर होईल, त्याचे सत्य सर्वांसमोर येईल याची भीती वाटून जयंतने आजीला मारण्याचा प्रयत्न केला. आता आजी कोमात आहे. मात्र, जयंतच्या या कृत्याबद्दल जान्हवीला समजले आहे. याबरोबरच, तिला आणखी एक सत्य समजले आहे, ते म्हणजे जयंतमुळेच व्येंकीचा आवाजा गेला आहे.
लहानपणी जयंतने व्येंकीला बोअरवेलमध्ये ढकलून दिले होते. ज्यामुळे त्याचा आवाज गेला. आता या सगळ्याची जयंतला शिक्षा व्हावी, म्हणून जान्हवीदेखील त्याच्याप्रमाणेच विचित्र गोष्टी करत आहे, वागत आहे. आजी कोमात असली तिला दवाखान्यातून घरी नेण्यास परवानागी दिली आहे. तिला पुन्हा जयंत-जान्हवीच्या घरी आणले आहे. तिची सेवा करण्यासाठी लक्ष्मीदेखील तिथेच राहत आहे. लक्ष्मी व श्रीनिवासच्या घराची काळजी त्यांची मोठी सून वीणा घेत आहे.
दरम्यान, मालिकेत पुढे काय होणार, भावना व सिद्धू आणखी जवळ येणार का, जयंतच्या विकृतपणाबद्दल सर्वांना कधी समजणार, हरिश-सिंचना कधी घरी परतणार, सिंचनाला तिची चूक समजणार का, संतोषच्या स्वभावात बदल होणार का, मालिकेत पुढे काय घडणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.