गेल्या काही दिवसांपासून ‘झी मराठी’ वाहिनीवरील नव्या मालिकांच्या चर्चा सुरू आहेत. नव्या मालिकांचे नवनवीन जबरदस्त प्रोमो प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्येही या नव्या मालिकांविषयी उत्सुकता वाढली आहे. नुकताच ‘पारु’ या नव्या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. ज्यामधून प्रमुख भूमिकांसह महत्त्वाच्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचा चेहरा उघड झाला आहे.

काल, २२ जानेवारीला रात्री ‘झी मराठी’ने सोशल मीडियाद्वारे ‘पारु’ या नव्या मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित केला. या प्रोमोमध्ये अवखळ आणि निरागस पारु पाहायला मिळत आहे. पण कडक शिस्तबद्ध असलेल्या अहिल्यादेवीच्या राज्यात पारु कशी टिकावा धरेल? हे मालिकेत पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – Bigg Boss 17: “बिग बॉसने माझी दोन घरं उद्ध्वस्त केली…”, पत्रकार परिषदेत मुनव्वर फारुकीचं वक्तव्य, व्हिडीओ व्हायरल

‘पारु’ या मालिकेत अभिनेत्री शरयू सोनावणेसह प्रसाद जवादे, मुग्धा कर्णिक प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. तसेच ‘जीव माझा गुंतला’ फेम पूर्वा शिंदे, ‘तू चाल पुढं’ फेम परी तेलंग, ‘खुमासदार नात्याचा गोडा मसाला’ फेम अनुज साळुंखे, ‘रात्रीस खेळ चाले’ फेम प्राजक्ता वाडये, ‘शुभविवाह’ फेम विजय पटवर्धन हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

हेही वाचा – सिद्धी आणि शिवाचं कमबॅक, ‘जीव झाला वेडापिसा’ मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘पारु’ व्यतिरिक्त ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘शिवा’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच ‘नवरी मिळे हिटलरला’, ‘पुन्हा कर्तव्य आहे’, ‘जगद्धात्री’ या नवीन मालिका देखील सुरू होणार आहेत. शिवाय ‘ड्रामा Juniors’ हा नवा रिअ‍ॅलिटी शो सुद्धा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे.