Sharayu Sonawane look on second day of Navratri: सण-उत्सव असले की, सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते. दैनंदिन कामापेक्षा काही वेगळ्या गोष्टी केल्या जातात. सध्या तर अनेकदा सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ शेअर केले जातात. त्यामुळे विविध ठिकाणची वैविध्यतादेखील पाहायला मिळते.
नवरात्रीला कालपासून सुरुवात झाली आहे. या नऊ दिवसांत नऊ रंगांचे कपडे परिधान केले जातात. देवीला त्या-त्या रंगाची साडी नेसवली जाते. आता झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ‘अशी’ तयार झाली पारू
या व्हिडीओमध्ये नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसासाठी अभिनेत्री शरयू सोनावणे म्हणजेच प्रेक्षकांची लाडकी पारू तयार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीला तिचा मेकअप करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर तिने लाल रंगाची साडी नेसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यावर तिने बाजूबंद अन् गळ्यात दागिने घातले आहेत. कपाळावर टिकली लावली आहे. लाल साडीमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे.
नेटकरी काय म्हणाले?
हा व्हिडीओ शेअर करताना झी मराठी वाहिनीने ‘नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसासाठी अशी सजली पारू’, अशी कॅप्शन दिली आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करीत शरयूचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “पारू खूप सुंदर दिसते”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “खूप सुंदर लूक”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “वाह! खूप सुंदर”, अशा कमेंट्स करीत चाहत्यांनी कौतुक केले आहे. अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे.



अभिनेत्री शरयू सोनावणेने पारू या मालिकेत पारू ही प्रमुख भूमिका साकारली आहे. सर्वांची काळजी घेणारी, प्रत्येक संकटाला धाडसाने सामोरी जाणारी, अहिल्यादेवी किर्लोस्करला देवी मानणारी, वडिलांचा आदर करणारी, आदित्यवर खूप प्रेम करणारी, प्रीतम व प्रियाला वेळोवेळी साथ देणारी, श्रीकांतला वडिलांप्रमाणे मानणारी आणि किर्लोस्कर घरासाठी काहीही करण्याची तयारी असणारी पारू प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसते.
नुकतेच पारू व आदित्यचे एकमेकांवर प्रेम आहे आणि त्यांनी एकमेकांशी लग्न केले आहे, हे सत्य अहिल्यादेवीसमोर आले. त्यानंतर अहिल्याने आदित्य व पारूला घरातून बाहेर काढले. आता मालिकेत पुढे काय होणार, अहिल्या आदित्य व पारूला पुन्हा घरात घेणार का? त्यांना माफ करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.