Prapti Redkar and Bhagyashree Dalvi dance Video: अभिनेत्री प्राप्ती रेडकर सध्या झी मराठी वाहिनीवरील सावळ्याची जणू सावली मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहे. या मालिकेत तिने सावली ही भूमिका साकारली आहे.

सावली या भूमिकेला प्रेक्षकांचे मोठे प्रेम मिळते. सावलीच्या चांगुलपणाचे, तिच्या गोड स्वभावाचे, सर्वांना आपलेसे करुन घेण्याच्या धडपडीचे प्रेक्षक कौतुक करताना दिसतात. तसेच, सावली जितकी प्रेमळ आहे, तितकीच ती खंबीरपणे तिच्यावर, तिच्या कुटुंबावर तसेच सारंगवर आलेल्या संकटांना सामोरी जाते. याबरोबरच, सारंग व सावली यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडते. त्यामुळे सावळ्याची जणू सावली ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे.

‘सावळ्याची जणू सावली’ फेम सावली व ताराचा भन्नाट डान्स

आता प्राप्ती तिच्या भूमिकेमुळे नाही तर तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. प्राप्तीने व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती तिची सहकलाकार भाग्यश्रीबरोबर डान्स करताना दिसत आहे. हृतिक रोशनच्या वॉर २ या चित्रपटातील ‘आवां जावां’ या गाण्यावर या दोघी अभिनेत्री डान्स करताना दिसत आहेत. दोघींच्या डान्स स्टेप्स आणि त्यांचे हावभाव लक्ष वेधून घेत आहेत.

चाहते दोन्ही अभिनेत्रींचे कौतुक करताना दिसत आहेत. “खूप सुंदर”, “खूप छान”, “तुम्ही दोघींनी एकत्र डान्स केला पाहिजे”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

प्राप्तीने याआधीदेखील या गाण्यावर डान्स केला होता. त्या व्हिडीओलादेखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले होते.

मालिकेत भाग्यश्रीने तारा ही भूमिका साकारली आहे. तारा अनेकदा ऐश्वर्याबरोबर मिळून सावलीविरुद्ध कटकारस्थान करताना दिसते. सावलीला घरात मिळणारे महत्व तिला पटत नाही. त्यामुळे सावलीला त्रास व्हावा यासाठी ती सतत प्रयत्न करताना दिसते. तसेच, जेव्हा तिला गरज असते तेव्हा ती सावलीची मदत घेते.

ऑनस्क्रीन सावली व तारा एकमेकांच्या विरोधात दिसत असल्या तरी ऑफस्क्रीन त्यांच्यात उत्तम मैत्री असल्याचे दिसते. आता मालिकेत पुढे काय वळण येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.