Savalyachi Janu Savali Upcoming Twist: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील सावली ही गुणी आणि हुशार आहे. प्रेमळ स्वभावाने ती तिच्या आजूबाजूच्या लोकांची मने जिंकते. प्रेमाने त्यांना आपलेसे करते. इतर वेळी शांत असणारी ही सावली संकट आल्यानंतर मात्र रणरागिणीचे रूप घेते. ती कायम तिच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी पुढे येते.

सावली ही गरीब कुटुंबातील आहे. मात्र, तरीही ती समाधानी आहे. तिची व तिच्या घरच्यांची विठ्ठलावर प्रचंड भक्ती असल्याचे पाहायला मिळते. सुख-दु:खाच्या प्रसंगी ती विठ्ठलाजवळ व्यक्त होताना दिसते. विठ्ठल आणि तिच्यामध्ये खास कनेक्शन आहे.

आता कार्तिकी एकादशीनिमित्त ती अन्नदान करताना दिसणार आहे. मात्र, यावेळीदेखील ऐश्वर्या विघ्न आणण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र, तिच्या मदतीला कोणीतरी खास येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळते.

कार्तिकी एकादशीला विठ्ठल सावलीच्या मदतीला धावणार

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर सावळ्याची जणू सावली मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, सावली प्रसाद बनवते. ती विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीसमोर हात जोडून उभी राहते आणि कृतज्ञता व्यक्त करते. ती म्हणते की, आज कार्तिकी एकादशीला माझ्या हातून अन्नदान घडत आहे, यापेक्षा दुसरं पुण्य काय असेल? ती सर्वांना जेवण वाढत असल्याचे दिसते. तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे.

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, सावली कामात असताना ऐश्वर्या सावलीने बनवलेल्या प्रसादाजवळ येते. ती मनातल्या मनात म्हणते की, पुण्य घडेल की पाप ते बघतेच. असे म्हणून ती त्या प्रसादात काहीतरी मिसळते. मात्र, एक लहान मुलगा येऊन तो प्रसाद पुन्हा शुद्ध करतो. हा प्रोमो शेअर करताना सावलीच्या मदतीला विठ्ठल येणार असल्याचे म्हटले आहे.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “सावलीच्या मदतीला साक्षात विठ्ठल धावून येणार”, अशी कॅप्शन दिली आहे. आता हा प्रोमो पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी राम कृष्ण हरी अशी कॅप्शन दिली आहे.

आता मालिकेत नेमकं काय घडणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.