Zee Marathi Serial New Actors Entry : ‘झी मराठी’ वाहिनीवर आजपासून म्हणजेच १२ मे ते १७ मे या दरम्यान दोन लोकप्रिय मालिकांचा महासंगम पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने संबंधित मालिकांमध्ये दोन नव्या कलाकारांच्या एन्ट्री होणार आहेत. हे दोन कलाकार नेमके कोण आहेत आणि त्यांच्या एन्ट्रीनंतर नेमका काय ट्विस्ट येणार याबद्दल जाणून घेऊयात…

‘झी मराठी’ वाहिनीवर ‘पारू’ आणि ‘सावळ्याची जणू सावली’ या दोन मालिकांचा महासंगम पाहायला मिळणार आहे. सावली आणि पारू एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी असतात. त्यामुळे सावली पारूला सांगते, “आमच्या सोहम भावोजींसाठी लग्नाचं स्थळ पाहिलंय. विश्वंभर ठाकूर यांच्या मुलीबरोबर म्हणजेच कियारा ठाकूरशी त्यांचं लग्न ठरवत आहेत.”

विश्वंभर ठाकूर या माणसाबद्दल पारूने याआधीच अहिल्यादेवीच्या तोंडून ऐकलेलं असतं. त्यामुळे ‘या घातक माणसाला कुटुंबापासून लांब ठेव’ असा सल्ला पारू सावलीला देते. आता या दोघी एकत्र मिळून विश्वंभर ठाकूर आणि त्याच्या मुलीला कसा धडा शिकवणार हे प्रेक्षकांना या महासंगममध्ये पाहायला मिळणार आहे.

‘पारु’ आणि ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकांच्या महासंगममध्ये विश्वंभर ठाकूर यांच्या रुपात ज्येष्ठ अभिनेते नागेश भोसले पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाले आहेत. यापूर्वी त्यांनी ‘देवयानी’, ‘अग्निहोत्र’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेलं आहे. त्यांच्यासह या मालिकेत आणखी एक अभिनेत्री एन्ट्री घेणार आहे. हीच विश्वंभर ठाकूर यांच्या मुलीची म्हणजेच कियाराची भूमिका साकारणार आहे.

‘चल भावा सिटीत’ या कार्यक्रमातून घराघरांत लोकप्रिय झालेल्या अक्षता उकिरडेचं नशीब उजळलं आहे. शोनंतर अभिनेत्रीला लगेच नवीन ऑफर मिळून तिची एन्ट्री मालिकाविश्वात झालेली आहे. अक्षता आणि नागेश भोसले यांच्या एन्ट्रीनंतर ‘झी मराठी’च्या या महासंगमचा प्रोमो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, विश्वंभर ठाकूर यांच्या मुलीचं सोहमशी लग्न होईल की त्याआधीच सावली सत्य उघड करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हा महासंगम १२ मे ते १७ मे हे पाच दिवस प्रेक्षकांना सायंकाळी ७ वाजता ‘झी मराठी’ वाहिनीवर पाहायला मिळेल.