‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही झी मराठी वाहिनीवरील मालिका सध्या बरीच चर्चेत आहे. प्रार्थना बेहरे व श्रेयस तळपदेची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळताना दिसते. त्याचबरोबरीने मालिकेमधील इतर कलाकारही चर्चेत असतात. त्यातीलच एक कलाकार म्हणजे अभिनेत्री काजल काटे. या मालिकेमध्ये ती शेफाली हे पात्र साकरत आहे. काजलचा पती प्रतिक कदमचंही काही सेलिब्रिटी मंडळींशी खास नातं आहे.

आणखी वाचा – Video : ‘वेडात मराठे वीर दौडले सात’साठी महेश मांजरेकरांचा लेक जीममध्ये करतोय मेहनत, सत्याने एकाचवेळी उचललं १७० किलो वजन

काजलचा नवरा प्रतिक हा एक प्रसिद्ध फिटनेस कोच आहे. मुंबई इंडियन्स संघाचा फिटनेस कोच म्हणून तो काम पाहतो. काजलही आपल्या पतीसह मुंबई इंडियन्स संघाच्या क्रिकेटपटुंबरोबर एकत्र दिसते. आता प्रतिकचा सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीबरोबरचा फोटो सोशल मीडिया व्हायरल झाला आहे.

प्रतिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये तो अभिनेत्री दिशा पटानीसह दिसत आहे. फोटोमध्ये दिशा जीमच्या कपड्यांमध्ये दिसत आहे. तर प्रतिकही अगदी फिट दिसत आहे. प्रतिकने दिशासह फोटो शेअर करत म्हटलं की, “Professionals at work.”

आणखी वाचा – बॉयफ्रेंडशीच केलं लग्न, पण त्याआधीच दुसऱ्या व्यक्तीशी…; लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर शिल्पा तुळसकरचा खासगी आयुष्याबाबत खुलासा

काजल ही मूळची नागपूरची आहे. तिने ‘डॉक्टर डॉन’, ‘स्वराज्यजननी जिजामाता’ अशा मालिकांमध्येही काम केलं आहे. काजलच्या लग्नाला आता तीन वर्षं पूर्ण झाली आहेत. नवऱ्याबरोबरचे फोटोही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करताना दिसते.