झी मराठी वाहिनीवरील ‘नवा गडी नवं राज्य’ ही मालिका सातत्याने चर्चेत आहे. या मालिकेत विविध ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. पण आता या मालिकेच्या वेळेत मोठा बदल केला जाणार आहे. नुकतंच या मालिकेत काम करणाऱ्या एका अभिनेत्रीने याबद्दलची माहिती दिली आहे.

नवा गडी नवं राज्य या मालिकेतील सर्वच पात्रांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसतात. या मालिकेत कश्यप परुळेकर,पल्लवी पाटील आणि अनिता दाते-केळकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकत आहेत. मात्र आता लवकरच ही मालिका प्रेक्षकांना नव्या वेळेत पाहायला मिळणार आहे.
आणखी वाचा : Video : साईशा भोईरचा ‘नवा गडी नवा राज्य’ मालिकेला रामराम, ‘ही’ बालकलाकार झळकणार ‘चिंगी’च्या भूमिकेत, प्रोमो समोर

गेल्या काही दिवसांपासून झी मराठी वाहिनीवर चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. येत्या २५ सप्टेंबरपासून हा कार्यक्रम रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या वेळेत नवा गडी नवं राज्य ही मालिका प्रक्षेपित केली जाते. त्यामुळे अनेक चाहते ही मालिका बंद होणार का? याबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहेत.

आता या प्रश्नावर अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी उत्तर दिले आहे. “नवा गडी नवं राज्य ही मालिका बंद होणार आहे का? कारण टीव्हीवर २५ सप्टेंबरपासून ९ वाजता प्रदर्शित होणार आहे” असे दाखवत आहेत. त्यावर वर्षा दांदळे यांनी “ही मालिका बंद होत नाही. ८.३० वाजता या नव्या वेळेत दाखवली जाणार आहे”, असे सांगितले.

Nava Gadi Nava Rajya serial
नवा गडी नवं राज्य मालिकेच्या वेळेत होणार बदल

आणखी वाचा : “वंशाचा दिवा पुढे नेणारा…”, विशाखा सुभेदारने सांगितले मुलाचे नाव अभिनय ठेवण्यामागचे कारण, म्हणाली “सिनेसृष्टीत काम…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळे ‘नवा गडी नवं राज्य’ ही मालिका २५ सप्टेंबरपासून रात्री ८:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर ३९१ एपिसोड पूर्ण करुन २१ ऑक्टोबरला ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचेही बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दलची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.