Tarini Serial Promo : ‘तारिणी’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. अभिनेत्री शिवानी सोनार यामधून मुख्य भूमिकेत पाहायला मिळते. शिवानी साकारत असलेली तारिणीची भूमिका ही सगळ्यांना सांभाळून घेणारी, कुटुंबाची काळजी घेणारी अशी आहे. या मालिकेत नेहमी नवनवीन ट्विस्ट आलेले पाहायला मिळतात. अशातच आता मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे.
‘तारिणी’ मालिकेत सध्या निशी व युवराज यांच्या लग्नाची तयारी सुरू आहे. परंतु, निशीचा होणारा नवरा युवराज आहे याबद्दल तारिणीला माहिती नसते. त्यामुळे तिला त्याला पाहून धक्का बसतो. कारण- यापूर्वी तारिणी व युवराजमध्ये भांडण झालेलं असतं. युवराजसह तारिणीचं त्याची बहीण कौशिकीबरोबरही भांडण झालेलं असतं; पण बहीण व घरच्यांच्या आग्रहाखातर ती कौशिकीची माफी मागते आणि निशीच्या साखरपुड्याच्या तयारीला लागते. तेवढ्यात तिथे असलेला युवराज तिच्यसमोर येतो, असं मालिकेत पाहायला मिळालं.
युवराजला पाहिल्यानंतर तारिणी त्याच्याबद्दलचं सत्य तिच्या कुटुंबाला सांगण्याचा प्रयत्न करते; पण सगळे तिलाच दोष देतात आणि कौशिकीसुद्धा तिच्यावर रागावते. पण, तारिणी सगळ्यांसमोर युवराजचं सत्य सांगते हे ऐकूण सगळ्यांना धक्का बसतो. नंतर युवराज त्याची चूक मान्यही करतो आणि आता तो तसा नसून, त्यानं त्याच्या चुका सुधारल्या असल्याचं म्हणतो. त्यानंतर युवराज तारिणीची माफीदेखील मागणार असल्याचं म्हणतो. अशातच आता मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे.
तारिणी मालिकेचा प्रोमो
‘झी मराठी’ वाहिनीने सोशल मीडिया पेजवरून हा प्रोमो शेअर करीत त्याला, ‘तारिणीला युवराजची माफी मागावी लागेल का?’ अशी कॅप्शन दिली आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये युवराज तारिणीची माफी मागताना दिसतोय. यावेळी तो तिला, “तारिणी, मी खरच सुधारलो आहे. मी तुला कुठला पुरावा देऊ म्हणजे तुला पटेल. पायावर नाक घासू का? सांग” असं म्हणतो आणि तिच्या पाया पडतो. त्यावेळी कौशिकी त्याला थांबवते आणि “या उद्धट मुलीच्या पाया वगैरे पडण्याची गरज नाहीये. चल…” असं म्हणते आणि त्याला तिथून घेऊन जात असते.
कौशिकी व युवराजला त्यावेळी सगळे थांबवण्याचा प्रयत्न करीत असतात. तेव्हा कौशिकी थांबते आणि म्हणते, “साखरपुडा होणार; पण त्याआधी तारिणीला युवराजची माफी मागावी लागेल.” पुढे तारिणीचे बाबा तिला, “अगं, तिचा संसार सुरू होण्याआधीच उद्ध्वस्त होऊ देऊ नकोस गं”, असं म्हणतात. प्रोमोमध्ये पुढे तारिणी केदारबरोबर बोलताना दिसते. केदार तिला “हे बघ मला एवढंच कळतंय की, तुझी एक माफी त्याच्या हजार चुकांवर पांघरूण घालेल”, असं म्हणत समजावतो. त्यानंतर पुढे तारिणी “मी माफी मागण्याआधी युवराजचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार”, असं म्हणते.
त्यामुळे आता तारिणी युवराजचा खरा चेहरा सगळ्यांसोर आणू शकेल का की, तिला तिच्या बहिणीसाठी युवराजची सगळ्यांसमोर माफी मागावी लागेल हे मालिकेच्या येत्या भागात पाहायला मिळेल. मालिकेचा हा भाग प्रेक्षकांना १७ ऑक्टोबरला पाहायला मिळणार असल्याचं वाहिनीने सोशल मीडियावरून शेअर केलेल्या प्रोमोखाली लिहिलं आहे.