Tarini Upcoming Twist: तारिणी ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेतील तारिणी, कौशिकी, निशी, केदार, सुमी ही आणि इतर सर्वच पात्रे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहेत.

तारिणी ही पोलीस आहे. मात्र की अंडरकव्हर असल्याने ती आणि तिच्या टीममधील इतर त्यांची खरी ओळख जगासमोर सांगू शकत नाहीत. ते गुन्हेगारांना धडा शिकवतात, त्यांना योग्य ती शिक्षा देतात, संकटात असलेल्या सर्वांना ते मदत करतात. मात्र, खरी ओळख ते कोणालाही सांगू शकत नाहीत. त्यामुळे तारिणी नेमकं काय काम करते, याबद्दल तिच्या कुटुंबातील व्यक्तींनादेखील माहित नाही.

तारिणीची खरी ओळख कौशिकीसमोर येणार?

आता मात्र, तारिणीने आतापर्यंत तिची लपवून ठेवलेली ओळख पुन्हा सर्वांसमोर येणार का, असा प्रश्न समोर आलेला प्रोमो पाहिल्यानंतर निर्माण होत आहे. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर तारिणीचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की कौशिकीची मुलगी ईरा खेळत आहे. तिथेच जवळ एका बाजूला तारिणी आणि दुसऱ्या बाजूला कौशिकी आहे.

ईरा खेळत असते, त्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर दोन मुले भांडण करत असतात.त्यांचा धक्का लागून तेथील एक कुंडी खाली पडते. ती इराला लागणार असते. तारिणी तप्तरता दाखवते आणि ईराला वाचवते. तिला प्रेमाने जवळ घेत तिला कुठेही लागले नसल्याची खात्री करते.

तारिणीला पाहून इराला आठवते की जेव्हा गुंडांनी तिला किडनॅप केले होते, तेव्हा तारिणीनेच तिला वाचवले होते. तितक्यात कौशिकी येते आणि ईराला विचारते की तुला लागलं नाही. इराला बोलता येत नसल्याने ती कौशिकीला हातवारे करुन तारिणीने तिला वाचवल्याचे सांगते.

हा प्रोमो शेअर करताना, तारिणीची खरी ओळख ईरा कौशिकीला सांगणार का? अशी कॅप्शन दिली आहे.

आता कौशिकीला तारिणी एक पोलीस ऑफिसर असल्याचे समजणार का? स्वत:ची ओळख लपवून जे युनिट नागरिकांची मदत करते, ज्याबद्दल कोणालाच माहित नाही, त्यामध्ये तारिणी महत्वाचा भाग असल्याचे समजणार का? याबरोबरच, ज्यावेळी तिला तारिणीबद्दल समजणार, त्यावेळी तिचे तारिणीबद्दलचे मन बदलणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.