Tula Japnar Aahe upcoming twist: मालिकेत येणारे ट्विस्ट हे प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यास मदत करतात. गुन्हेगारीवर आधारित, भयपट, विनोदी अशा विविध जॉनरच्या मालिका विविध वाहिन्यांवर प्रदर्शित होतात. प्रत्येक जॉनरचा एक वेगळा प्रेक्षकवर्ग असतो. मालिकेतील पुढील भागात काय होणार, याची कायमच प्रेक्षकांना उत्सुकता असते.
तुला जपणार आहे ही झी मराठी वाहिनीवरील मालिका गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. मालिकेतील मीरा, वेदा, अर्थव, शिवनाथ, अंबिका, मंजिरी, माया ही आणि इतर पात्रे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहेत.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, मायाच्या कट कारस्थानामुळे अंबिकाचा मृत्यू झाला आहे. मात्र, अंबिकाच्या आत्म्याला शांती न मिळाल्याने तो भटकत आहे. अंबिकाचा आत्मा मीरा, शिवनाथ यांच्याशी बोलू शकतो. तसेच, तो मीरा व शिवनाथ यांच्यासह तो मंजिरीलादेखील दिसतो. मीरा ही अंबिकाची धाकटी बहीण आहे. मात्र, मीराला याबद्दल माहित नाही.
याचे कारण म्हणजे अंबिकाचे खरे नाव राधा असे आहे. लहानपणीच तिची व तिच्या कुटुंबाची ताटातूट होते. ती अंबिका म्हणून अनाथ आश्रमात वाढते. त्यानंतर तिचे अर्थवशी लग्न होते. त्यांना वेदा ही मुलगी होते. मात्र, अंबिकाची मैत्रीण असलेली माया तिचा विश्वासघात करते.
तिला अर्थवशी लग्न करायचे असल्याने ती कट कारस्थान करते आणि अंबिकाला मारून टाकते. या सगळ्यामागे मंजिरीचा हात आहे. पण, मंजिरी सर्वांसमोर ती चांगली असल्याचे नाटक करते. चिरकाल तारूण्य मिळवण्यासाठी ती बळी देत असल्याचे पाहायला मिळते. तसेच तिने अंबिकाच्या आत्म्याला देखील कैद करून ठेवल्याचे पाहायला मिळाले आहे.
आता या सगळ्यात मायाने मीराला ती तिची बहीण म्हणजे राधा असल्याचे सांगितले. जेव्हा मीराने हे वडिलांना शिवनाथला सांगितले. तेव्हा त्यांनी तिला एक रुद्राक्ष दिला आणि हा रुद्राक्ष जिथे तिला नेईल, तिथे तिची बहीण सापडेल.
आता मीराला तिच्या राधा ताईचे सत्य समजणार असल्याचे, समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘तुला जपणार आहे’ या मालिकेचा प्रोमो शेअर केला.
“मीच तुझी राधाताई…”
या प्रोमोमध्ये मीरामुळे अंबिकाच्या आत्म्याची कैदेतून सुटका होते. त्यावेळी मीरा तिला विचारते की अंबिका ताई मी माझ्या राधा ताईला शोधत होते. मग मी इथे कशी आले? त्यावेळी अंबिका तिला सांगते की कारण- मीच तुझी राधाताई आहे. हे ऐकल्यानंतर मीरा भावुक होते. ती रडत म्हणते, ज्या राधाताईची मी इतकी वर्षे वाट पाहिली. ती सापडली पण आत्म्याच्या रुपात सापडली. त्यानंतर ती राधाताई असे म्हणत अंबिकाला मीठी मारते.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “रक्ताच्या नात्याची ओळख पटणार; मीरा आणि राधाची अखेर भेट होणार”, अशी कॅप्शन दिली आहे. हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रोमोचे कौतुक केले आहे. तसेच, ही मालिका आणि या दोन्ही अभिनेत्री आवडत्या असल्याचेदेखील चाहत्यांनी कमेंट करत लिहिले आहे.
आता अंबिकाचं राधा असल्याचे सत्य समोर आल्यानंतर मीरा काय करणार, मायाचा खरा चेहरा ती सर्वांसमोर आणू शकणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
