Swanandi aka Tejashri Pradhan look on first day of Navratri: अभिनेत्री तेजश्री प्रधान ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तेजश्रीने तिच्या कारकि‍र्दीत काही मराठी मालिका आणि चित्रपट यांमधून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

‘होणार सून मी या घरची’ ते ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेतील तेजश्रीच्या भूमिकांना मोठी लोकप्रियता मिळाली. काही दिवसांपूर्वीच ती ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत तिने स्वानंदी ही भूमिका साकारली आहे.

प्रेमळ तितकीच कडक शिस्तीची, जशास तसे उत्तर देणारी, भावा-बहि‍णींवर खूप प्रेम करणारी, वडिलांच्या जवळची अशी ही स्वानंदी सर्वांची मने जिंकून घेताना दिसत आहे. तसेच तिची समर राजवाडेबरोबरची भांडणेदेखील लक्ष वेधून घेतात. वय जास्त होऊनही लग्न न झाल्यामुळे स्वानंदीला अनेकदा बाहेरच्यांसह घरच्यांची बोलणी ऐकून घ्यावी लागतात. या मालिकेत तेजश्रीबरोबर अभिनेते सुबोध भावे प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. अभिनेत्रीच्या अभिनयाचे वेळोवेळी कौतुक होताना दिसते.

नवरात्रीच्या पहिल्या दिवसासाठी कशी तयार झाली स्वानंदी?

आता मात्र अभिनेत्री तिच्या अभिनयामुळे नाही, तर झी मराठी वाहिनीने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. या व्हिडीओमध्ये तेजश्री नवरात्रीच्या पहिल्या दिवसासाठी तयार होत असल्याचे पाहायला मिळते. व्हिडीओमध्ये सुरुवातीला ती मेकअप करून घेत असल्याचे पाहायला मिळते.

व्हिडीओमध्ये पुढे पाहायला मिळते की तेजश्रीने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे, दागिने घातले आहेत. नाकात नथ घातली आहे. कपाळावर टिकली लावली आहे. तिचे केस मोकळे असल्याचे पाहायला मिळत आहेत. तिचा हा लूक लक्ष वेधून घेत आहे. तेजश्री या लूकमध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे. पुढे ती वेगवेगळ्या पोझदेखील देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “नवरात्रीच्या पहिल्या दिवसासाठी अशी सजली स्वानंदी”, अशी कॅप्शन दिली आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करत अभिनेत्रीचे कौतुक केले आहे.

नेटकरी काय म्हणाले?

“तेजश्री खूप गोड दिसत आहे”, “खूप सुंदर”, “खूप सुंदर, खूप छान”, “खूप क्युट आणि सुंदर”, “वाह!काय लूक आहे”, “खूप छान दिसतेस”, सौंदर्यवती अप्सरा”, “नेहमीप्रमाणे खूप सुंदर दिसत आहेस”, “तू नेहमीच माझी आवडती आहे”, “मराठमोळी देवसेना”, “लव्ह यू स्वानंदी”, “खूपच सुंदर तेजू दीदी”, अशा अनेक कमेंट्स करत चाहत्यांनी ‘वीण दोघांतली ही तुटेना’मधील स्वानंदीचे म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधानचे कौतुक केले आहे.

दरम्यान, आता ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत पुढे काय ट्विस्ट येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.