Veen Doghatli Hi Tutena Upcoming Twist: ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय ठरताना दिसत आहे. मालिकेत येणारे ट्विस्ट, नवनवीन घटना, नात्यांमध्ये येणारी जवळीक, दुरावा अशा अनेक बाबी पाहायला मिळतात.

मालिकेतील समर व स्वानंदी यांच्यात सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने गैरसमज होताना दिसतात. काहीवेळा समरचा लहान भाऊ अंशुमन, काकू मल्लिका त्यांच्यात गैरसमज करताना दिसतात. स्वानंदीला त्रास देण्यासाठी त्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसते. समर आणि स्वानंदी यांच्यात अनेक गोष्टींबाबतदेखील मतभेद असल्याचे दिसते. मात्र, या सगळ्यात ते दोघेही त्यांच्या भावंडांच्या आनंदासाठी, सुखासाठी प्रयत्न करताना दिसतात.

स्वानंदीचा भाऊ रोहन आणि समरची बहीण अधिरा एकमेकांच्या प्रेमात आहेत. त्यांचे लवकरच लग्न होणार आहे. पण, या सगळ्यात रोहनने सर्वांसमोर ही अट ठेवली होती की जोपर्यंत त्याच्या मोठ्या बहिणीचे स्वानंदीचे लग्न होणार नाही, तोपर्यंत तो लग्न करणार नाही. त्याच्या हट्टासाठी ती लग्न करण्यासाठी तयार झाली आहे. मात्र, मल्लिकाच्या कारस्थानामुळे स्वानंदीचे लग्न मोडते. त्यानंतर स्वानंदी लग्न करणार नाही असे म्हणते. तिच्या वडिलांना धक्का बसतो. तसेच, अधिरादेखील स्वत:ला इजा पोहोचवत असल्याचे प्रोमोमध्ये दिसते.

आता या सगळ्यानंतर स्वानंदी व समर एकमेकांशी साखरपुडा करणार असल्याचे पाहायला मिळत आहे. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की स्वानंदीच्या बाबांचा झालेला अपमान, तिचा मोडलेला साखरपुडा या गोष्टी दिसतात.

पुढे स्वानंदी असे म्हणते की, “मी आता हरले आहे. मला आता काही कळत नाहीये. त्यामुळे ज्या कुठल्या धोंड्याशी लग्न करायचं आहे, ते करते. त्यावर समरची आजी म्हणते, “मग माझ्या धोंड्याशी कर. मला यामध्ये काहीतरी दैवी संकेत असावाच असे वाटत आहे. तुम्ही दोघं एकमेकांशी लग्न करा.” आजीचे हे बोलणे ऐकल्यानंतर समर आणि स्वानंदीच्या चेहऱ्यावर गोंधळ दिसतो.

समर म्हणतो, “कुठल्याही गोष्टीपेक्षा मला आता अधिराच्या जीवाची जास्त भीती वाटत आहे.” त्यावर स्वानंदी म्हणते, “बाबांनासुद्धा हार्ट कंडिशन आहे. त्यांनाही इतका ताण सहन होऊ शकत नाही.” त्यावर समर म्हणतो, “म्हणजे आता इलाज नाहीये नाही ना, कितीही नको असला तरीही”

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की स्वानंदी व समर एकमेकांशी लग्न करण्यासाठी तयार होतात. ते साखरपुड्यासाठी तयार होऊन येतात. त्यानंतर ते एकमेकांना अंगठी घालत असल्याचे दिसत आहे. त्यांचा साखरपुडा पार पडणार आहे.

नेटकरी काय म्हणाले?

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “कुटुंबासाठी का होईना पण दोघं एकत्र येणार”, अशी कॅप्शन दिली आहे. आता हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. “या दोघांच्या नात्याची वीण जोडली जावी असे मनापासून वाटणाऱ्या सगळ्यांना आनंदच होणार आहे. मस्तच. हा भाग पाहण्यासाठी उत्सुक आहे”, “काकीने स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली.”

“अखेर, समर आणि स्वानंदी यांचा साखरपुडा होणार, हा भाग पाहण्यासाठी उत्सुक आहे”, “अखेर, हे घडत आहे. ही सगळी मल्लिका काकूंची कृपा आहे. मल्लिका काकू हा स्वानंदी आणि प्रतिकचा साखरपुडा मोडण्यासाठी आभार. आता मालिका बघण्यासाठी उत्सुक आहे”, “अखेरीस स्वानंदी समर राजवाडे उर्फ पिंट्या यांची वीण घट्ट जोडली जाणार”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

आता मालिकेत पुढे काय होणार, दोन मतभेद असणाऱ्या दोन व्यक्ती एकत्र आल्यानंतर त्य़ांचा संसार कसा पुढे जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.