Shaky song by Sanju Rathod : ‘गुलाबी साडी’, ‘काली बिंदी’ या गाण्यांच्या यशानंतर काही दिवसांपूर्वीच संजू राठोडने ‘शेकी’ हे त्याचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणलं. या गाण्यात संजूसह ‘बिग बॉस’चं हिंदी पर्व गाजवणारी अभिनेत्री ईशा मालवीय झळकली आहे. ‘शेकी’ गाणं २२ एप्रिलला प्रदर्शित करण्यात आलं आणि अवघ्या काही दिवसांतच संजूच्या या नव्या गाण्याची सर्वांना भुरळ पडली.

सध्या सामान्य लोकांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटींपर्यंत सगळेच संजूच्या ‘शेकी’ गाण्यावर थिरकत असल्याचं पाहायला मिळत आहे. यातील “एक नंबर, तुझी कंबर…” हे गाण्यातील सुरुवातीचं कडवं सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या गाण्यावर नेटकरी हुबेहूब हुकस्टेप्स करून डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

संजू राठोडच्या या मराठी गाण्याची क्रेझ आता सातासमुद्रापार देखील पोहोचली आहे. थायलंडमधील एका लोकप्रिय अभिनेत्याने संजूच्या व्हायरल गाण्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळत आहे. या अभिनेत्याचं नाव निपत चारोएनफोल ( Nipat Charoenphol ) असून त्याला सगळेजण ‘पॅट्रिक’ ( Patrick ) या नावाने ओळखतात. या अभिनेत्याने संजूच्या ‘शेकी’ गाण्यावर जबरदस्त एक्स्प्रेशन्स देत डान्स केल्याचं पाहायला मिळत आहे.

विदेशी अभिनेता पॅट्रिकचा मराठी गाण्यावरचा हटके डान्स सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. संजूने त्याच्या व्हिडीओवर ‘Bro फायर’ अशी कमेंट केली आहे. तर, ईशा मालवीयने देखील “तू खूप सुंदर डान्स केला आहेस” असं पॅट्रिकच्या व्हिडीओवर कमेंट करत म्हटलं आहे.

याशिवाय मराठी युजर्सनी देखील पॅट्रिकच्या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “जय महाराष्ट्र”, “लव्ह इट”, “तू थाई अभिनेता आहेस हे अनेकांना माहिती नसेल… मस्तच डान्स केलास”, “बापरे गाण्याची किती क्रेझ आहे”, “भावा आता भारतात येऊन जा”, “लय भारी डान्स” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी अभिनेत्याचा डान्स पाहून केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘Shaky’ या गाण्याचा लेखक आणि गायक स्वत: संजू राठोड असून, या गाण्याची संगीत निर्मिती G-Spark ने केली आहे. या गाण्याला गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे.