आज १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे. आजचा दिवस हा प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी लोक आपल्या साथीदारासोबत घालवतात आणि प्रेम व्यक्त करतात. याच निमित्ताने बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या पार्टनरसाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दिसतात. दरम्यान, एका अभिनेत्रीने पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीवरील प्रेमाचा खुलासा केला आहे.
शाहिद आफ्रिदी हा अभिनेत्री महिका शर्माचा क्रश होता. आज व्हॅलेंटाइन डे निमित्त त्याच्याविषयी बोलताना ती म्हणाली, ‘त्यावेळी मी खूप लहान होते. मला आजही आठवते की मी जेव्हा पहिल्यांदा स्वतःला स्पर्श केला तेव्हा शाहिद आफ्रिदीची कल्पना केली होती. मी त्याचा विचार करुनच स्वत:ला स्पर्ध केला होता. मला तो प्रचंड आवडायचा. ती माझी पहिली वेळ होती आणि मला या सर्व गोष्टींची भीती देखील वाटत होती. ती माझी पहिलच वेळ होती आणि मला शाहिद आफ्रिदी अजूबाजूला असल्याचे भासत होते. त्यामुळे तो मला प्रचंड आवडतो.’
आणखी वाचा : कोण आहे अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डी? जाणून घ्या त्यांची लव्हस्टोरी
पुढे महिका म्हणाली, ‘आता मी मोठी झाले आहे आणि स्वत:वर प्रेम असणे हे किती गरजेचे आहे हे मला कळाले आहे. आपण स्वत:ला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रोत्साहन द्यायला हवे. स्वत:वर प्रेम असणे म्हणजे सेल्फिश असणे असे नाही. तुमचे स्वत:वर पूर्ण प्रेम असेपर्यंत तुम्ही दुसऱ्यावर प्रेम करु शकत नाही. स्वत:च्या कथेत आपण जिंकले पाहिजे आणि या सर्वात स्वत:वर प्रेम करणे हे धाडस असते. स्वत:ला स्पर्श करणे लज्जास्पद नाही.’
महिका याआधी अॅडल्ट मूव्ही अभिनेता डॅनी डी याला डेट करत होती. त्या दोघांनी “द मॉडर्न कल्चर” या चित्रपटातही काम केले आहे. ती ‘एफआयआर’ सारख्या टीव्ही मालिकांमध्येही दिसली आहे. मिस्टर जो बी कार्व्हालो, चलो दिल्ली आणि मर्दानी यांसारख्या चित्रपटात तिने काम केले आहे.