amitabh bachchan shares helplessness story in blog : बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांचे आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी राहिलेले नाही. मेगास्टार अमिताभ बच्चन अनेकदा त्यांच्या ब्लॉगद्वारे अनेक किस्से सांगतात.
पण, यावेळी त्यांनी त्यांच्या असहाय्यतेचा एक किस्सा सांगितला, ज्यामध्ये ते रिकाम्या खिशामुळे गजरा विकणाऱ्या एका लहान मुलीला मदत करू शकले नाहीत. त्यांना ही घटना वर्षानुवर्षे आठवते. त्यांनी स्वतः अलीकडेच याबद्दल सांगितले.
बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये एक किस्सा शेअर केला आहे. त्यांनी लिहिले, “मी स्वतःबरोबर काही वेळ घालवला… पाकिटातील पैसे संपले होते… एक लहान मुलगी गाडीच्या खिडकीजवळ आली आणि त्यांना गजरा खरेदी करण्यास सांगितले.”
अमिताभ बच्चन यांनी सांगितला ‘तो’ किस्सा
अमिताभ पुढे लिहितात, “मी माझ्या पाकिटातील सर्व पैसे खर्च केले होते… गाडी पुढे सरकली तेव्हा मी त्या लहान मुलीकडे उदास डोळ्यांनी पाहात होतो… जी पावसात भिजत उभी होती, माझ्याकडे आशेने पाहात होती, त्यावेळी मला खूप वाईट वाटले… कदाचित त्या पाकिटाने तिच्या जेवणाची व्यवस्था केली असती.”
चाहत्यांना दिला ‘हा’ सल्ला
अमिताभ यांनी त्यांच्या चाहत्यांना नेहमी त्यांच्या पाकिटात काही पैसे ठेवण्याचा सल्ला दिला, जेणेकरून गरजूंना मदत करता येईल. ते पुढे म्हणाले, “मी त्या मुलीला मदत करू शकलो नाही म्हणून मी खूप अस्वस्थ आहे… या अनुभवातून मी एक धडा शिकलो की आपण नेहमी आपल्या पाकिटात काही पैसे ठेवले पाहिजेत, जेणेकरून जेव्हा गरजू व्यक्तीला मदत करण्याची संधी येते तेव्हा आपण रिकाम्या हाताने जाऊ नये… एखाद्याची आशा तोडणे खूप दुःखद आहे, म्हणून आपण कोणाचीही आशा तोडू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.”
कामाच्या बाबतीत बोलायचे झाले, तर अमिताभ बच्चन यांनी त्यांचा लोकप्रिय क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती’ च्या नवीन सीझनचे शूटिंग सुरू केले आहे, जो “हू वॉन्ट्स टू बी अ मिलियनेअर?” या इंग्रजी शोचे हिंदी रूपांतर आहे. अमिताभ बच्चन यांनी जवळजवळ प्रत्येक सीझनमध्ये हा शो होस्ट केला आहे. शाहरुख खान शोच्या तिसऱ्या सीझनमध्येच होस्ट म्हणून जोडला गेला होता.