छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय आणि गाजलेला शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’. विशेष म्हणजे या कार्यक्रमाची संपूर्ण टीम आपल्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसते. नुकतंच या शो मध्ये बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या सूर्यवंशी टीमने हजेरी लावली. यावेळी त्यांनी चित्रपटाच्या शूटींगदरम्यानचे अनेक किस्से सांगितले. यावेळी बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ ही चक्क अक्षयच्या पाया पडली.

कतरिनाने कपिल शर्माच्या शो मध्ये एंट्री केली त्यावेळी तिने अक्षय सोडून इतर सर्वांना नमस्कार वैगरे केला. हे सर्व बघितल्यानंतर अक्षय नाराज झाला. तो लगेचच उठला आणि ही गोष्ट सर्वांच्या लक्षात आणून दिली. अक्षय म्हणाला, “तुम्हाला सर्वांना एक गोष्ट समजली का? कतरिना आली, त्यावेळी तिने सर्वांना हाय, हॅलो म्हटले. अर्चना यांना नमस्कार म्हणाली. कपिलला भेटली. पण मला भेटलीच नाही. पाहा याला म्हणतात ज्येष्ठांचा आदर करणं,” असा टोमणा अक्षयने कतरिनाला सर्वांसमोर मारला.

यावेळी कतरिनालाही तिची चूक लक्षात आली. त्यानंतर लगेचच ती तिची चूक कबूल करत म्हणाली, “नाही असं अजिबात नाहीय” आणि यानंतर काही वेळानंतर ती अक्षयच्या पाया पडते. हे सर्व पाहून अक्षय, कपिलसह सर्वजण जोरजोरात हसू लागतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सूर्यवंशी चित्रपट हा ५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ चित्रपटाने शुक्रवारी जोरदार सुरुवात केली. शनिवारी चित्रपटाचा दुसरा दिवस होता. अपेक्षेप्रमाणे पहिल्या दिवसाप्रमाणेच दुसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणात कमाई झाली. दिवाळीच्या दीर्घ सुट्ट्यांचा फायदा चित्रपटाला होताना दिसत आहे. अक्षय कुमार आणि कतरिना कैफच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी २६.२९ कोटींचा गल्ला जमवला. बॉक्स ऑफिस इंडियानुसार, चित्रपटाने दुसऱ्या दिवशी २४.५० कोटींचा गल्ला जमवला आहे.