scorecardresearch

‘द कपिल शर्मा शो’मध्ये दिसणार नाहीत नवज्योत सिंह सिद्धू, काय आहे कारण?

पंजाब विधानसभा निवडणूकांमध्ये नवज्योत सिंह सिद्धू यांचा पराभव झाला आहे.

Navjot Singh Siddhu, kapil sharma, the kapil sharma show, kapil sharma show makers, ashok pandit, अशोक पंडित, कपिल शर्मा शो, कपिल शर्मा, नवज्योत सिंह सिद्धू
शोच्या निर्मात्यांनी स्पष्टीकरण देत सिद्धू या शोमध्ये पुन्हा दिसणार नसल्याचं म्हटलं आहे.

काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू यांना सगळीकडूनच हार पत्करावी लागत आहे. पंजाब विधानसभा निवडणूकांमध्ये नवज्योत सिंह सिद्धू यांना हार पत्करावी लागली आहे. सिद्धू यांनी पक्ष बदलला, शक्य ते सर्व प्रयत्न केले पण मुख्यमंत्री पद त्यांना मिळू शकलेलं नाही. या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांच्यावर टीका देखील केली जात आहे. एवढंच नाही तर त्यांचं राजकीय कारकिर्दही संपल्यानं ते लवकरच कपिल शर्मा शोमध्ये पुन्हा दिसणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र यावर शोच्या निर्मात्यांनी स्पष्टीकरण देत सिद्धू या शोमध्ये पुन्हा दिसणार नसल्याचं म्हटलं आहे.

एकीकडे निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि दुसरीकडे ‘द कपिल शर्मा शो’च्या निर्मात्यांनीही आपला निकाल सांगितला आहे. यावरून आता सिद्धू यांना पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची खुर्ची तर मिळू शकली नाहीच पण त्यांनी कपिल शर्मा शोची खुर्ची देखील गमावली असं बोललं जात आहे. नवज्योत सिंह सिद्धू यांच्याबाबत निर्माते अशोक पंडित यांनी केलेलं ट्वीट चर्चेत आहे.

आणखी वाचा- The Kashmir Files प्रमोशन वादावर कपिल शर्माचं स्पष्टीकरण; म्हणाला “त्यांनी केलेले आरोप…”

अशोक पंडित यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, ‘ज्या लोकांना नवज्योत सिंह सिद्धू यांच्या कपिल शर्मा शोमध्ये परत येण्याविषयीची चिंता आहे. त्यांना मी सांगू इच्छितो. Federation Of Western India Cine Employees ने नवज्योत सिंह सिद्धू यांच्या विरोधात पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानं नॉन को- ऑपरेशन जारी केलं आहे. याचा सरळ अर्थ आहे की ते ‘कपिल शर्मा शो’मध्ये वापसी करू शकत नाहीत.’

आणखी वाचा- Video : ‘हिंदी बोलता येतं का?’ प्रश्नावर सामंथाच्या उत्तराने जिंकली सर्वांची मनं, पाहा व्हिडीओ

अशोक पंडित यांच्या या ट्वीटनंतर नवज्योत सिंह सिद्धू यांचे चाहते निराश झाले आहेत. दरम्यान मागच्या काही दिवसांपासून ‘द कपिल शर्मा’ शो देखील सतत्यानं वादाच्या भोवऱ्यात अडकलेला दिसत आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शोच्या मेकर्सनी नकार दिल्याचा आरोप चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी केल्यानंतर हा शो चर्चेत आला होता. ज्यामुळे शो बंद करावा अशी मागणीही सोशल मीडियावर होताना दिसली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The kapil sharma show makers clear that navjot singh siddhu will not anymore part of the show mrj