scorecardresearch

“लोक माझा तिरस्कार करत आहेत, ही माझ्यासाठी…”, The Kashmir Files ‘बिट्टा’ची भूमिका साकारणाऱ्या चिन्मय मांडलेकरने केले वक्तव्य

‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे.

the kashmir files, chinmay mandlekat, farooq malik bitta,
'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे.

सध्या संपूर्ण भारतात चर्चा सुरु आहे ती ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची. हा चित्रपट अनेक रेकॉर्ड तोडत आहे. या चित्रपटातील प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतर आहे. पण फक्त एकाच भूमिकेचा तिरस्कार केला जात आहे आणि तो म्हणजे फारुख मल्लिक बिट्टाच्या भूमिकेचा. हे भूमिका मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता चिन्मय मांडलेकर याने साकारली आहे. सोशल मीडियावर चित्रपट आणि त्यातील भूमिकांचे खूप कौतुक होत असताना चिन्मयला सतत द्वेषयुक्त मेसेज आणि कमेंट केल्या जात आहेत. याविषयी त्याची प्रतिक्रिया काय आहे याचा खुलासा चिन्मयने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

चिन्मयने नुकतीच ‘आजतक’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने सोशल मीडियावर मिळणाऱ्या द्वेषयुक्त मेसेवर वक्तव्य केलं आहे. चिन्मय सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंग आणि शिवीगाळवर म्हणाला, “कुटुंब आणि मित्रपरिवार मला मेसेज करून माझ्या भूमिकेचा तिरस्कार वाटतो असे सांगत माझ्या अभिनयाचे कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर अनेकजण मेसेज करून, राग काढत शिवीगाळ करत आहेत. लोकांमधील तो राग मी जागृत करू शकलो याचा मला आनंद आहे. लोक माझा तिरस्कार करत आहेत, ही माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे.”

आणखी वाचा : ‘कालचा एपिसोड बघून वाईट वाटलं ना…’, परी आणि मामीचा भन्नाट श्रीवल्ली डान्स पाहिलात का?

आणखी वाचा : एकाच वेळी फणा काढलेल्या तीन सापांसोबत खेळत होता हा मुलगा आणि…; बघा Viral Video

चिन्मय चित्रपटाला मिळणाऱ्या कमाई विषयी म्हणाला, “चित्रपटाला इतका प्रतिसाद मिळेल असे वाटले नव्हते. काश्मीर फाइल्सच्या सक्सेसबद्दल मी विचार करत होतो, की कदाचित दोन ते तीन आठवड्यांनंतर हा चित्रपट चित्रपटगृहात त्याची पकड मजबूत करेल. तर पहिल्या रात्रीपासूनच या चित्रपटाने कमालीची कमाई केली.”

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The kashmir files actor chinmay mandlekar who plays farooq malik bitta is getting hate messages from fans dcp

ताज्या बातम्या