scorecardresearch

‘द काश्मीर फाईल्स’ने रचला नवा विक्रम, ‘या’ गोष्टीत ‘ब्रह्मास्त्र’ला टाकले मागे

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाशी तुलना केली जात आहे.

‘द काश्मीर फाईल्स’ने रचला नवा विक्रम, ‘या’ गोष्टीत ‘ब्रह्मास्त्र’ला टाकले मागे

मागच्या महिन्यामध्ये सर्वत्र बॉयकॉट बॉलिवूड हा नवा ट्रेंड सुरु झाला होता. या ट्रेंडचा प्रभाव ‘लाल सिंग चड्ढा’, ‘रक्षाबंधन’ सारख्या बिगबजेट चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर झाला. याच सुमारास ‘ब्रह्मास्त्र’ हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होणार होता. बॉयकॉट ट्रेंडमुळे हा चित्रपट देखील फ्लॉप होणार असे म्हटले जात होते. तरीही सर्व अंदाज खोटे ठरवत या चित्रपटाने चांगली कमाई करुन दाखवली. या चित्रपटाची ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाशी तुलना केली जात आहे. परंतु नुकत्याच जाहीर झालेल्या एका यादीनुसार ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाने एका बाबतीत ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाला मागे टाकले आहे.

आणखी वाचा : “याआधी कधीच..” रॉजर फेडररच्या निवृत्तीवर अभिनेत्री ईशा गुप्ताची भावून पोस्ट

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट खूप गाजला. प्रदर्शनाच्या आधीच कथानकाच्या विषयावरुन चित्रपटाने सर्वाचे लक्ष वेधले होते. काश्मिरी पंडितांची व्यथा मांडणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली. चित्रपटातील कलाकारांच्या कामाचेही खूप कौतुक झाले. हा चित्रपट भारतातील यावर्षी सर्वात जास्त नफा कमावणारा चित्रपट ठरला आहे.

खूप कमी दिवसात ३६० कोटी कमावत ‘ब्रह्मास्त्र’ने ‘द काश्मीर फाईल्स’ला मागे टाकले आहे, अशा चर्चा रंगल्या होत्या. ४१० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘ब्राह्मस्त्र’ चित्रपट अवघ्या १५ दिवसांत जगभरात ३८५ कोटींचा गल्ला जमवत वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटापूर्वी हा विक्रम ‘भूल भुलैया २’ या चित्रपटाच्या नावावर होता. ‘भूल भुलैया २’ने जगभरात २६६ कोटींचे कलेक्शन केले होते. पण ‘ब्रह्मस्त्र’ने कितीही रेकॉर्ड ब्रेक कमाई केली असली तरी ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाने सर्वात जास्त नफा कमावला आहे.

हेही वाचा : “‘बॉयकॉट बॉलिवूड’ हा चांगला ट्रेंड…” ; विवेक अग्निहोत्रींनी साधला निशाणा

‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट १५ ते २५ कोटींमध्ये बनविण्यात आला. तर या चित्रपटाने जगभरातून ३४० कोटींची कमाई केली. इतक्या मोठ्या संख्येने नफा कमवत ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट भारतातील सर्वात जास्त प्रॉफिटेबल चित्रपट बनला आहे.

‘द काश्मीर फाईल्स’ मध्ये विवेक अग्निहोत्री यांनी ९० सालातील काश्मिरी पंडितांचा पलायनवाद, त्यांच्यासोबत झालेल्या अत्याचारावर भाष्य करत मोठ्या पडद्यावर ते दाखवण्याचं धाडस केलं होतं. चित्रपटाला पाहून अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या