NCB अधिकारी ‘त्या’ दिवशी एकाचवेळी मन्नत आणि अनन्या पांडेच्या घरी, समीर वानखेडेंनी सांगितलं कारण

दुसरीकडे आर्यन खानसोबतच्या कथित व्हॉट्सअॅप चॅटमुळे अनन्या पांड्ये अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून चौकशी केली जात आहे. या प्रकरणी एनसीबीने अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला अटक केली आहे. तर दुसरीकडे एनसीबीला आर्यन आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे या दोघांचे काही चॅट्स सापडले आहेत. त्यामुळे तिचीही चौकशी केली जात आहे. दरम्यान या प्रकरणी एनसीबीकडून मुंबईत वांद्रे, अंधेरी अशा वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत. एनसीबीच्या एका पथकाने काही दिवसांपूर्वी शाहरुखचा बंगला मन्नत आणि अनन्या पांडे च्या घरी जाऊन तपासणी केली. पण ही तपासणी एकाच दिवशी का केली? असा प्रश्न अनेकांना पडला. नुकतंच या प्रश्नाचे उत्तर समोर आले आहे.

मुंबई-गोवा क्रूझवरील अमली पदार्थांच्या पार्टीप्रकरणी एनसीबीकडून कसून चौकशी सुरु आहे. एनसीबीकडून सध्या आर्यन खानच्या बँक खात्याची चौकशी केली जात आहे. यातून त्याने ड्रग्जवर पैसे खर्च केले आहेत का? याबद्दल माहिती शोधली जात आहे. जर आर्यनने ड्रग्ज घेतले असतील तर त्याने कुठून खरेदी केले? याचाही शोध एनसीबी घेत आहे. तर दुसरीकडे आर्यन खानसोबतच्या कथित व्हॉट्सअॅप चॅटमुळे अनन्या पांडे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. येत्या सोमवारी एनसीबीकडून पुन्हा एकदा अनन्याची चौकशी केली जाणार आहे. यावेळी तिला ड्रग्जबद्दल काही प्रश्न विचारले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अनन्या पांडेच्या घरी एनसीबीचे पथक दाखल; आर्यन खान प्रकरणाशी संबंध असण्याची शक्यता

दरम्यान गुरुवारी २१ ऑक्टोबरला एनसीबीचे एक पथक शाहरुखच्या घरी दाखल झाले. तर दुसरे पथक अनन्याच्या घरी पोहोचले. यावेळी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मन्नत बंगल्यात जाऊन आर्यनचे काही कागदपत्र ताब्यात घेतली. यावेळी कोणतीही छापेमारी करण्यात आली नाही, अशी माहिती एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिली.

समीर वानखेडेंनी दिलेल्या माहितीनुसार, “शाहरुखच्या मन्नत बंगल्यात कोणत्याही प्रकारची छापेमारी करण्यात आलेली नाही. एनसीबीची टीम फक्त आर्यनचे काही कागदपत्र ताब्यात घेण्यासाठी गेले होते. मन्नत मध्ये कोणत्याही प्रकारची छापेमारी करण्यात आली नाही. तर दुसरीकडे त्याच दिवशी अनन्या पांडेच्या वांद्रे येथील घरी काही कागदपत्र घेण्यासाठी गेली होती,” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

आर्यन जवळपास २० दिवसांपासून तुरुंगात

याप्रकरणी एनसीबीने अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान गेल्या जवळपास २० दिवसांपासून तुरुंगात आहे. त्याचा तुरुंगवास संपायची चिन्ह दिसत नाही. तर दुसरीकडे एनसीबीला अनन्या आणि सध्या तुरुंगात असलेला आर्यन खान या दोघांचे काही चॅट्स सापडले आहेत. त्यातून धक्कादायक खुलासे होत आहेत. या पार्श्वभूमीवर अनन्या पांडेची ड्रग्जप्रकरणी एनसीबीकडून सलग दुसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आली. वडील चंकी पांडेंसोबत आलेल्या अनन्याची पहिल्या दिवशी गुरुवारी (२१ ऑक्टोबर) २ तास चौकशीनंतर, शुक्रवारी (२२ ऑक्टोबर) एनसीबीने पुन्हा ४ तास चौकशी केली. यानंतर एनसीबीने पुन्हा एकदा सोमवारी (२५ ऑक्टोबर) अनन्याला चौकशीसाठी बोलावलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The reason behind ncb visiting mannat and ananya panday home the same day nrp

Next Story
गॉसिप