‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटाला ५० आठवडे चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचं प्रेम मिळत होतं. चित्रपटाच्या ‘गोल्डन ज्युबिली’चा शो खूप गाजला. त्यावेळी बॉलिवूडचे ‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार उपस्थित होते. शो संपल्यानंतर त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे व अशोक सराफ यांच्यासोबत आवर्जून फोटो काढला.

आणखी वाचा : ‘अशी ही बनवाबनवी’चा रिमेक येणार का?; सचिन पिळगावकर म्हणतात..
हा चित्रपट आजची पिढीही आवडीने पाहते आणि त्यांनादेखील या चित्रपटाचे संवाद उत्तम पाठ आहेत. जेव्हा पुण्याच्या प्रभातला ३ रुपये फर्स्ट क्लास आणि ५ रुपये बाल्कनीला तिकीट होते तेव्हा ३ कोटीचा व्यवसाय या चित्रपटाने केला. हेच गणित आज लावले तर शंभर कोटीच्या घरात पोहोचेल.