अनुपम खेर यांची भूमिका असलेला ‘द बिग सिक’ हा हॉलिवूड चित्रपट पॉर्नहब या वेबसाइटवर अपलोड करण्यात आला आहे. यामध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या पाकिस्तानी- अमेरिकन कॉमेडियन आणि अभिनेता कुमैल नान्जियानी याने ट्विटरवरून याची माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुमैल त्याच्या विनोदबुद्धीसाठी प्रसिद्ध आहे आणि या ट्विटमधून त्याने आपल्याच अंदाजात ही गोष्ट सांगितली. ‘ज्यांना हा चित्रपट पाहायचा असेल त्यांनी संपूर्ण कुटुंबीयांसह पॉर्न वेबसाइटवर पाहू शकता,’ अशी कोपरखळी त्याने मारली. कुमैलच्या या ट्विटवर संबंधित पॉर्न वेबसाइटने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत उत्तर दिले. आमच्या साइटवरून तो चित्रपट हटवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, मात्र त्यात आम्हाला यश मिळत नाही आहे, असे स्पष्टीकरण पॉर्नहबद्वारे देण्यात आले.

वाचा : न्यायालयाचा अवमान, सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशींविरोधात याचिका

यावर कुमैलनेही उपरोधिकपणे पुन्हा ट्विट केले की, ‘साइटवरून तो चित्रपट काढण्यात यावा असे मला म्हणायचे नव्हते. तुम्ही ख्रिसमस साजरा करा. लोकांच्या मनोरंजनासाठी तुम्ही खूप मेहनत घेतली आहे.’

हा चित्रपट पॉर्नहब साइटवर कसा अपलोड झाला, हाच प्रश्न अनेकांना पडला आहे. १४ जुलै २०१७ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात कुमैल मुख्य भूमिकेत असून मायकल शोवॉल्टरने त्याचे दिग्दर्शन केले आहे. या रोमॅण्टिक कॉमेडी चित्रपटात अनुपम खेर सहाय्यक भूमिकेत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This anupam kher film is available on an adult website
First published on: 28-12-2017 at 16:09 IST