करिष्मा कपूर आणि संजय कपूर यांच्यातील  कायदेशीर वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यासंबंधी आता नवी माहिती पुढे आली असून, त्यानुसार करिष्मा कपूरने संजयला घटस्फोट देण्यास नकार दिला आहे. तसेच, ती त्याच्याकडे परत जाण्यासही तयार नसल्याचे कळते.
डीएनए या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, या दोघांमधील वाद न क्षमण्याचे कारण म्हणजे करिष्माला संजयकडून मिळणारी पोटगीची रक्कम असल्याचे कळते. संजयचे कैलासवासी वडिल डॉ. सुरिंन्दर कपूर हे हयात असताना करिष्मा आणि तिच्या वकिलाला हाताळत होते. तेव्हा त्यांनी करिष्मा आणि संजयच्या दोन मुलांकरिता एक निश्चित रक्कम देण्याचे वचन दिले होते. मात्र, त्यांच्या मृत्युनंतर त्यांनी करिष्माला दिलेले वचन न पाळण्याचा  निर्धार संजयच्या कुटुंबियांनी केला. आपल्याला हे काही परवडणारे नाही असे त्यांचे मत होते. त्यामुळे करिष्मानेही सर्वांच्या संमतीने घटस्फोट मागे घेण्याचा निर्णय घेतला.